सदा सर्वदा दानधर्म... कर्मात कर्म हे आद्य..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:45 PM2020-04-03T22:45:16+5:302020-04-03T22:45:31+5:30
नाशिक : ‘सदा सर्वदा दानधर्म, क्षुधाशांती परम वर्म, अन्नदान नित्यनेम, कर्मात कर्म हे आद्य’ या पंक्तींचा अनुभव ‘याची देही ...
नाशिक : ‘सदा सर्वदा दानधर्म, क्षुधाशांती परम वर्म, अन्नदान नित्यनेम, कर्मात कर्म हे आद्य’ या पंक्तींचा अनुभव ‘याची देही याची डोळा’ अनुभवास मिळत आहे. कोरोनाचे संकट जिल्ह्यात थैमान घालत असल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर अनेक निराधारांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत उपेक्षितांच्या मुखी दोन घास पडावेत, त्यांचेही जगणे सुलभ व्हावे, या समाजिक दातृत्वाच्या भावनेतून जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. यातून सामाजिक आरोग्य जपण्याचा वसा घेतल्याचे आशादायी चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे.
नेहरू चौक मित्रमंडळातर्फे मोफत किराणा वाटप
सिन्नर : नेहरू चौक मित्रमंडळाच्या वतीने वंजार गल्ली, सातपीर गल्ली, भिल्लवस्ती भागातील गरजूंना भाजीपाला, मसाला आणि खाद्यतेलाचे मोफत वाटप करण्यात आले. संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. रोजगार नसल्यामुळे गरजूंना वसंतबाबा नाईक आणि अनिल वराडे, किरण मुत्रक यांच्या पुढाकारातून भाजीपाला, किराणा, खाद्यतेल आणि मसाला देऊन सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी सोपान तेलंग, संदीप गोरे, सतेज धात्रक, सोनू धारणकर, बाळू मुत्रक, मंगेश मुत्रक, मोहन कर्पे, विजय बोडके, दत्ता मुत्रक, नीलेश भडांगे, गणेश बकरे, अमोल भडांगे, संजय भडांगे, सागर मुत्रक, डॉ. श्रीकांत मुत्रक, दिगंबर भडांगे आदी उपस्थित होते.
कसबे सुकेणेच्या मजूर वस्तीत मदतीचा ओघ
कसबे सुकेणे : येथील मजूर वस्तीत विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शुक्रवारी पुरोहित अजितशास्त्री पिंपळे यांनी पस्तीस कुटुंबीयांना विनामूल्य भाजीपाला वितरित करून सामाजिक दातृत्व निभावले आहे. मदतीचे अनेक हात गोरगरीब समाजाच्या मदतीसाठी पुढे येऊ लागले आहेत.
कसबे सुकेणेचे व्यापारी व द्राक्ष उत्पादक सुमित गांधी यांनी मुंबई येथील सेवाकर्मींसाठी तीस क्विंटल द्राक्ष रवाना केले. अजित पिंपळे यांनी कसबे सुकेणे रेल्वेस्थानकाजवळील मजूर वस्तीत जाऊन पस्तीस कुटुंबीयांना मोफत भाजीपाला वितरित केला आहे.
कसबे सुकेणे येथे दानशूरांनी सुरू केलेल्या मदतकार्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून, या मदतकार्याचे कौतुक केले आहे. क्रि केटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही कौतुक केले आहे. सुमित गांधी, अजित पिंपळे गुरु जी यांच्या उपक्र माची दखल स्वीडन येथील वेब सिरीजचे दुबईकर दादूस यांनी लाईव्ह आभार मानत जगभरातल्या प्रेक्षकांना अनुकरण करण्याचा संदेश दिला. कसबे सुकेणे येथील मजुरांना लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने बिकट परिस्थिती आहे. छोटीसी मदत म्हणून वस्तीत विनामूल्य भाजीपाला वाटप केला.
- अजित पिंपळे गुरु जी, कसबे सुकेणे
आम्ही मालेगावकर संघर्ष समितीतर्फे धान्य वाटप
मालेगाव : आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे सलग सहाव्या दिवशी गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले. देशालाच नव्हे तर पूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या कोरोना व्हायरसमुळे नागरिकांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हातावर पोट भरणाऱ्यांची उपासमार होऊ लागली असून, अशा बिकट परिस्थितीत शहरातील विविध सामाजिक संघटना मदतीसाठी पुढे येत आहेत. मयूर शाह परिवारातर्फे धान्याच्या २०० पाकिटांचे वाटप समितीमार्फत करण्यात आले. दररोज किमान ५०० ते ६०० पाकिटांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती निखिल पवार यांनी दिली. कोणीही रोख स्वरूपात मदत देण्याकरिता समीतीस कॉल करू नये. महेश पटोदिया, कैलास राठी, पवन झुनझुनवाला, पुरुषोत्तम काबरा, दर्शन लोणारी, आरती महाजन, गोकुळ देवरे, पोपटलाल जैन, हेमंतकुमार लदनिया, पवनसूत बिल्डकॉन, नीलेश शाह, विनोद कुचेरिया,, शांतीलाल बाफना, रवींद्र देवरे, भावेश दोशी, अनिल पाटील, सुशील शेवाळे, रोशन गांगुर्डे, अमित अलई, बंटी निकम, अजित गांधी, आशीष जैन, संजय गांधी, कुणाल शाह, सचिन पाटील, संदीप मोरे, सचिन भकोड, दिनेश भावसार, मोहन देवरे, महेंद्र भालेराव, रोमित राका आदी मदत करीत आहेत.