सदा सर्वदा दानधर्म... कर्मात कर्म हे आद्य..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:56 PM2020-04-04T22:56:55+5:302020-04-04T23:01:35+5:30
नाशिक : ‘सदा सर्वदा दानधर्म, क्षुधाशांती परम वर्म, अन्नदान नित्यनेम, कर्मात कर्म हे आद्य’ या पंक्तींचा अनुभव ‘याची देही याची डोळा’ अनुभवास मिळत आहे. कोरोनाचे संकट जिल्ह्यात थैमान घालत असल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर अनेक निराधारांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
टीम लोकमत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘सदा सर्वदा दानधर्म, क्षुधाशांती परम वर्म, अन्नदान नित्यनेम, कर्मात कर्म हे आद्य’ या पंक्तींचा अनुभव ‘याची देही याची डोळा’ अनुभवास मिळत आहे. कोरोनाचे संकट जिल्ह्यात थैमान घालत असल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर अनेक निराधारांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत उपेक्षितांच्या मुखी दोन घास पडावेत, त्यांचेही जगणे सुलभ व्हावे, या समाजिक दातृत्वाच्या भावनेतून जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. यातून सामाजिक आरोग्य जपण्याचा वसा घेतल्याचे आशादायी चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे.