मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच मदत

By admin | Published: November 22, 2015 10:50 PM2015-11-22T22:50:03+5:302015-11-22T22:51:51+5:30

दिपनकर बोस : संत आईसाहेब शाळेला आर्थिक मदत

Always help with girls' education | मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच मदत

मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच मदत

Next

नाशिक्नरोड : राज्यभरातील मुलींच्या शिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी स्टेट बॅँक आॅफ इंडिया कटिबद्ध असून, यापुढेही याकामी बॅँक शाळांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या मुंबई विभागाचे मुख्य महाप्रबंधक दिपनकर बोस यांनी केले.
पळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश मीडियम स्कूलला प्रयोगशाळा उभारण्यासाठी बॅँकेच्या वतीने ९ लाख ५७ हजार रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश देताना बोस बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या मुंबई नेटवर्क विभागाच्या महाप्रबंधक सोफी मॅथ्यूज, रेश्मा बोस, मुंबई विभागाचे उपमहाप्रबंधक अश्रफ अली बेग, नाशिक शहर क्षेत्रिय प्रबंधक पतित पावन नंदा, ग्रामीण क्षेत्रिय प्रबंधक सुनील खैरनार, मुख्य प्रबंधक मनोहर रिदूरकर, यज्ञेश, राजू तळेगावकर, शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, राजाराम गायधनी, सरपंच नवनाथ गायधनी, संपत गायधनी आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक विष्णुपंत गायखे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप जाधव व आभार अशोक गायधनी यांनी मानले.

Web Title: Always help with girls' education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.