आमडोंगरा पाड्याची भागली तहान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 01:38 PM2020-04-05T13:38:35+5:302020-04-05T13:39:12+5:30
पेठ -देशावर कोरोना विषाणू संक्रमणाची महामारी चालू असतांना दुसरीकडे पेठ तालुक्यातील आमडोंगरा गावावर दुहेरी संकट ओढवले असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या समस्येवर स्थानिक जलिमत्रांच्या सतर्कतेने तात्पुरती तहान भागली आहे.

कोरोनामुळे घराबाहेर पडू नये असा आदेश असतांना पेठ तालुक्यातील आम डोंगरा येथील विहीरींनी तळ गाठल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची भयानक परिस्थिती निर्माण झाली असतांना ही बाब जलपरिषद मित्र परिवाराच्या लक्षात आली. तात्काळ दखल घेत ग्रुप ग्रामपंचायत चे सरपंच पंढरीनाथ महाले यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्याने सरपंचानी गावातील काही वर्षापासून नादुरु स्त हातपंप दुरूस्त करण्यासाठी कारागीर बोलावून दुरु स्त करण्यात आले हातपंपाला पाणीसाठा कमी असला तरी काही दिवसासाठी आमडोंगरा ग्रामस्थांची तहान भागली आहे. याप्रसंगी जलपरिषद सदस्य -शरद पवार , कुमार पवार ,सरपंच पंढरीनाथ महाले, ग्रा.पं. सदस्य मीराबाई महाले, भागवत महाले, मोतीराम महाले, विजय महाले, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.