डोंगराच्या आगीत आमराई होरपळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:45 AM2018-03-06T01:45:19+5:302018-03-06T01:45:19+5:30
तालुक्यातील आई भवानी डोंगराला गेल्या आठवड्यात लागलेल्या आगीत सोनांबे शिवारातील आमराई होरपळली असून, शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
सिन्नर : तालुक्यातील आई भवानी डोंगराला गेल्या आठवड्यात लागलेल्या आगीत सोनांबे शिवारातील आमराई होरपळली असून, शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सोनांबे शिवारात डी.एम. पवार यांच्या मालकीच्या आमराईसह सिताफळ आणि चिकू आदींचे सुमारे दोनशे झाडांना आगीचा फटका बसला आहे. आंब्याची झाडे होरपळल्याने पवार यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सरपंच पुष्पा पवार, पोलिस पाटील चंद्रभान पवार, महसूल कर्मचारी संदीप बोडके, दत्तू पवार आदींनी घटनास्थळी पाहणी केली. परिसरातील सुमारे दीडशे एकरावरील गवत आगीच्य भक्षस्थानी पडले. सोपान पवार, दिलीप पवार, तानाजी पवार आदींच्या मालकीच्या तब्बल तेराशे गवताच्या पेंढ्या तसेच इतर कापलेले गवत आणि वैरण आगीत जळून खाक झाले. सोबतच भवानी मंदीराला पाणीपुरवठा करणाºया प्लॅस्टीक पाईपचेही आगीत नुकसान झाले आहे. दरम्यान, डोंगराला आग लावण्याच्या मागील पंधरा दिवसातील तिसरी घटना आहे. आग लावण्यचा घटना वारंवार घडत असल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये संतापाचे वातावरण आहे.