अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन  अध्यक्षपदाच्या दावेदारीचा वाद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:14 AM2018-05-12T00:14:36+5:302018-05-12T00:14:36+5:30

अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मे महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत असून, सत्ताधारी एकता पॅनलने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वरुण तलवार यांचे नाव आधीच जाहीर केल्याने दुसºया गटाने यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. यावर या दोन्ही गटांत समझोता करण्यासाठी माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या आहेत.

Ambad Industries and Manufacturing Association president | अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन  अध्यक्षपदाच्या दावेदारीचा वाद कायम

अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन  अध्यक्षपदाच्या दावेदारीचा वाद कायम

googlenewsNext

सिडको : अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मे महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत असून, सत्ताधारी एकता पॅनलने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वरुण तलवार यांचे नाव आधीच जाहीर केल्याने दुसºया गटाने यास आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे. यावर या दोन्ही गटांत समझोता करण्यासाठी माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलने दुसºया गटाच्या उमेदवारांना विश्वासात न घेता नवीन अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वरुण तलवार यांचे नाव घोषित केल्याने दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील निवडणुकीत दिलेला शब्द पाळला नसल्याने चव्हाण गटाची नाराजी कायम असून, यातून मार्ग काढण्यासाठी पुन्हा गुरुवारी (दि. १०) आयमाचे संस्थापक अध्यक्ष भास्कर कोतवाल, शशिकांत जाधव, मार्गदर्शक सुनील बागुल, लघु उद्योगभारतीचे अध्यक्ष संजय महाजन, माजी अध्यक्ष रमेश वैश्य, संजीव नारंग, धनंजय बेळे, ज्ञानेश्वर गोपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार कायम ठेवून दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण यांना यंदाच्या वेळी उपाध्यक्षपद देऊन दोन वर्षांनंतर चव्हाण यांना अध्यक्षपदाची संधी देण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते. तुषार चव्हाण यांनी याबाबत सकारात्मक विचार केला असला तरी दोन वर्षांनंतर अध्यक्षपद देणार असल्याबाबत लेखी पत्र द्यावे, असा पवित्रा घेतला आहे. यावर येत्या रविवारी पुन्हा दोन्ही गटांकडील वरिष्ठांची चर्चा होऊन यानंतर निर्णय जाहीर केला जाणार असला, तरी तुषार चव्हाण यांना दोन वर्षांनंतर अध्यक्षपद देण्यात येणार असल्याचे लेखी पत्र संघटनेने दिले नाही तर अध्यक्षपदासाठी चव्हाण हे उमेदवारी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीस माजी अध्यक्ष विजय तलवार, बी. पी. सोनार, योगेशभाई कनानी, जे. एम. पवार, रमेश पवार, जे. आर. वाघ, एस. एस. बिर्दी, संदीप सोनार, ज्ञानेश्वर गोपाळे, सुरेश माळी, विवेक पाटील, राजेंद्र अहिरे, दुसºया गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार तुषार चव्हाण आदींसह आयमाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Ambad Industries and Manufacturing Association president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक