अंबड पोलीस ठाणे हद्दीत चार घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:56 AM2020-09-14T00:56:15+5:302020-09-14T00:56:38+5:30
सिडको व अंबड भागात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. परिसरात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको : सिडको व अंबड भागात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. परिसरात झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुने सिडको, खोडे मळा येथील रहिवासी संतोष जोशी यांनी दिलेल्या फिर्याद म्हटले आहे की, आम्ही गावाला गेलो असल्यामुळे घराला कुलूप होते. चोरट्यांनी संधी साधत घरफोडी करून कपाटात ठेवलेले मंगळसूत्र साडेसात तोळ्याची सोन्याची चेन, नेकलेस असा दोन लाख पंचवीस हजार रु पये किमतीचे दागिने चोरून नेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे करीत आहेत.
दुसरी घटना रायगड चौकात घडली. राहुल तागड यांनी पोलिसांत फिर्याद दिली. शनिवारी (दि.१२) रात्री घराचा पहिल्या मजल्यावरील दरवाजा उघडा होता. चोरट्यांनी त्या मार्गे प्रवेश करून घरातील लॅपटॉप व मोबाइल असा १ लाख ६४ हजार रु पये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार खांडेकर करीत आहेत.
तिसऱ्या घटनेत दत्त चौकातील बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे ६८ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्र वारी (दि. ११) रात्री नवीन नाशिकच्या दत्त चौक परिसरात घडली.
याप्रकरणी अनिता पंढरी वाघ (रा. दत्तचौक, नवी नाशिक) यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार शुक्र वारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्याचे तसेच चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथ्या घटनेत अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या आवारातून चोरट्यांनी १ लाख ८३ हजार ७८० रुपयांचे कास्टिंग पार्टचे ३० नग चोरी केल्याची घटना शुक्र वारी (दि.११) रात्री घडली. याप्रकरणी तिशन इस्तीयाक सैयद (रा. डीजीपीनगर, कामठवाडा) यांनी तक्र ार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांची औद्योगिक वसाहतीत ईएमएस इंजिनिअरिंग वर्कस नावाची कंपनी आहे. या ठिकाणी कंपनीच्या आवारात कासटिंग कम्पोनंट पशिनीचे पार्ट तयार करण्यासाठी लागरे कास्टिंगचे ३० पार्ट ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी हे पार्ट लंपास केले.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.