अंबड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:23 PM2018-08-13T23:23:57+5:302018-08-13T23:28:21+5:30
नाशिक : तक्रार अर्जावरून कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम चक्क पोलीस ठाण्यात स्वीकारणारे अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महिपाल धनसिंग परदेशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि़१३) रंगेहाथ पकडले़

अंबड पोलीस ठाण्यात तक्रारदाराने तक्रार दिली होती़ या तक्रार अर्जावरून कारवाई करण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महिपाल धनसिंग परदेशी यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती़ यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात परदेशी यांच्या विरोधात तक्रार केली होती़ या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोमवारी अंबड पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला होता़ त्यानुसार अंबड पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची मागणी करून रक्कम स्वीकारली असता परदेशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले़
पोलीस आयुक्त शहरात नवनवीन उपक्रम राबवून पोलिसांचा प्रतिमा जनमाणसात उंचावण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे पोलीस ठाण्यातील अधिकारी अशाप्रकारे पोलीस विभागाची इज्जत चव्हाट्यावर आणत आहेत़ दरम्यान, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक परदेशी विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शासकीय कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी वा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन उपअधीक्षक विश्वजित जाधव यांनी केले आहे़