अंबडमधील रस्ते खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:24 PM2018-12-29T23:24:22+5:302018-12-30T00:26:56+5:30

अंबड औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची, तर काही भागांतील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून दररोज हजारो कामगार ये-जा करीत असल्याने कामगारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

 Ambad road potholes | अंबडमधील रस्ते खड्ड्यात

अंबडमधील रस्ते खड्ड्यात

Next

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची, तर काही भागांतील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवरून दररोज हजारो कामगार ये-जा करीत असल्याने कामगारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेच्या वतीने रस्ते कामासाठी निधी मंजूर केलेला असतानाही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांबरोबर काही भागांतील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याबाबत आयमाच्या वतीने महापालिकेला अनेकदा निवेदन दिले आहे. तसेच प्रभागाच्या नगरसेवकांनीदेखील प्रभागसभेत यासाठी लक्षवेधी सूचना मांडल्या आहेत. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी औद्योगिक वसाहतीची पाहणी करून येथील अंतर्गत रस्ते तसेच पावसाळी गटार योजनेची कामे तत्परतेने करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. याबाबत सहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी अंतर्गत रस्ते तसेच पावसाळी गटार याजनेसाठी एकूण ११ कोटी रुपयांंचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे. परंतु अद्यापपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने रस्त्यांची अवस्था खराब झाली असून, याच रस्त्यावरून दररोज हजारो कामगार ये-जा करीत असून, खराब रस्त्यातून वाहन चालविताना अडचणी निर्माण होत आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील एल सेक्टरमधील अतुल डेअरी ते वैष्णवी इंडस्ट्री, विकीमेटलच्या समोरील रस्ता, ऐ-सेक्टरमधील मर्सिडीज शोरुम बाजूचा रस्ता,फ सेक्टर येथील निमेश इंडस्ट्री ते नील सिंधू इंडस्ट्रीसमोरील रस्ता, डब्लू सेक्टर येथील एमडी आॅटोमेशन ते साई उद्योग ते लिंक रोड, ड सेक्टर येथील गूड लक टेलर ते मेट्रो पोलीमरेस तसेच सुनीता इंजिनिअरिंग, मुंगी ब्रदर्स यांसह अंबड औद्योगिक वसाहतीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. महापालिकेने याबाबत त्वरित दखल घेत अंबड औद्योगिक वसाहतीतील खराब झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, करण्याची मागणी कामगार वर्गाकडून करण्यात येत आहे.
महासभेत आवाज उठविला
मनपाच्या वतीने अंबड औद्यागिक वसाहतीतील अंतर्गत व मुख्य रस्ते डांबरीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. याठिकाणी लवकरात लवकर रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी प्रभाग तसेच महासभेतही आवाज उठविला आहे.
४येत्या काही दिवसांत रस्त्यांची कामे सुरू न झाल्यास आयुुक्तांची भेट घेत प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रभागाचे नगरसेवक राकेश दोंदे यांनी सांगितले.

Web Title:  Ambad road potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.