अंबानेर-जिरेवाडी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:23 PM2020-02-21T23:23:48+5:302020-02-22T01:22:54+5:30
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी व अंबानेर अशा दोन ग्रामपंचायतीला जोडणाऱ्या अंबानेर-जिरवाडे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जिरवाडे येथील ग्रामस्थांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी व अंबानेर अशा दोन ग्रामपंचायतीला जोडणाऱ्या अंबानेर-जिरवाडे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. जिरवाडे येथील ग्रामस्थांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
जिरवाडे हे गाव अहिवंतवाडी ग्रामपंचायतीमधील गाव असून, या ठिकाणी प्रत्येक मतदानाच्या वेळी सर्वच पक्षांची नेते मंडळी येऊन आश्वासन देतात, नंतर मात्र या रस्त्याकडे मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच मागील वर्षी अंबानेर-जिरवाडे या चार किलोमीटरच्या रस्ता दुरु स्तीसाठी रस्त्यावर खडी टाकण्यात आली होती, परंतु काहीच दिवसात त्या रस्त्यावरील खडी ठेकेदाराने उचलून नेली व गायकवाड मळा ते जिरवाडे साधारण दीड ते दोन किलो मीटरचा रस्ता खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांना आली आहे. दोन ठिकाणी मोऱ्यांची भयानक अवस्था झाली असून, अंबानेर ते जिरवाडे रस्ता त्वरित दुरु स्त न केल्यास आंदोलन करणार असल्याचे रमेश घुले यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले.