आंबेबहुला, रायगडनगर, गौळाणे ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:38+5:302021-01-08T04:44:38+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कटुता आणि खर्च टाळावा, यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी आंबेबहुला ...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कटुता आणि खर्च टाळावा, यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी आंबेबहुला ग्रामपंचायतीमध्ये शिवाजी चुंभळे यांनी गावात बैठक घेऊन सर्वांना एकत्रित केले. यात ग्रामपंंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वर्षा अंतु गवारी, रमेश बळवंत ढगे, संगीता बाळू यादव, लक्ष्मण विनायक सुपे, सुमनबाई अशोक देशमुख, योगेश माणिक गडकरी, पांडुरंग विठोबा गवारी, अक्षदा किरण गवारी, कविता राजेंद्र ढगे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामसेवक श्रीमती रत्ना हौशीराम भोजणे उपस्थित होत्या
रायगडनगर ग्रामपंचायतचीही निवडणूक बिनविरोध झाली. यात रमेश गुलाब पारवे, रुख्मिणी रामू ठाकरे, संजय सखाराम लचके, काळुबाई सुभाष शीत, आवाडीबाई रामू गोहिरे, सुनीता रामनाथ गोहिरे, कैलास काशीनाथ गोहिरे यांची बिनविरोध निवड झाली.
गौळाणे येथे बिनविरोध निवडीसाठी सरपंच अजिंक्य चुंभळे, बाजीराव चुंभळे, सदानंद नवले सरपंच राज चारस्कर जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देशमुख, किरण गवारी यांनीही निवडणुकीत बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.
छायाचित्र आर फेाटोवर ०५ ग्रामपंचायत