आंबेडकरांचे दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 07:27 PM2019-04-17T19:27:30+5:302019-04-17T19:28:26+5:30
विंचूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विंचूर येथे बाबासाहेबांच्या जीवनातील प्रासंगिक दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
विंचूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने विंचूर येथे बाबासाहेबांच्या जीवनातील प्रासंगिक दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
येथील मातोश्री हौसाबाई दुसाने सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका यांच्यावतीने आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या हस्ते संपन्न झाले. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या जीवनाचा बहुमूल्य वेळ वाचनालयात घालवीला म्हणून ते कायदेपंडित झाले, आपल्याला संविधान मिळाले. या निमित्ताने आपल्या देशाचे नाव जगभर पोहोचले. तरु ण पिढीपर्यंत बाबासाहेबांचे कार्य पोहोचावे तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी, म्हणुन या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन शनिवार व रविवार या दोन दिवशी खुले ठेवण्यात आल्याचे वाचनालयाचे पदाधिकारी अविनाश दुसाने यांनी सांगितले. संकलन सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विजय जाधव तसेच राहुल पगारे यांनी केले.
आंबेडकरांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग, नागपूर दीक्षाभूमी यासारखी शेकडो दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनात खुली करण्यात आली. विंचूर सारख्या ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारचे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याने नागरिकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, सरपंच ताराबाई क्षिरसागर, उपसरपंच निरज भट्टड, प्रकाश मोरे, डि.बी. काद्री, किशोर पाटील, नितीन गायकवाड, जगन्नाथ जोशी, प्रकाश जाजू, भाऊसाहेब हुजबंद, नारायणे गुरूजी, राहुल पगारे, केशव क्षिरसागर, अनारसे दिलीप कोथमिरे, अॅड.संजय दरेकर, सतिश सांगळे, सचिन देशमुख, ज्ञानेश्वर गाडे, योगेश खुळे, संजय झाल्टे आदी उपस्थित होते.
प्रतिक्रि या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती वाचलेली होतीच. परंतु आंबेडकरांचे विचार, कार्य या प्रदर्शनातून खऱ्या अर्थाने अनुभवता आले.
- योगेश खुळे, विंचूर.