संस्कृत भाषेसाठी समर्पित आयुष्य करणारे अंभोरे सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:18 AM2021-09-05T04:18:34+5:302021-09-05T04:18:34+5:30
अध्यापनाचे काम करताना या दाम्पत्याने संस्कृतच्या प्रचार-प्रसारासाठी वाहून घेतले. दहा दिवसांत संस्कृत संभाषण शिकविण्याचे विनामूल्य वर्ग सुरू केले. इतकेच ...
अध्यापनाचे काम करताना या दाम्पत्याने संस्कृतच्या प्रचार-प्रसारासाठी वाहून घेतले. दहा दिवसांत संस्कृत संभाषण शिकविण्याचे विनामूल्य वर्ग सुरू केले. इतकेच नव्हे, संस्कृती भारती या संस्थेशी ते जोडले गेल्यानंतर आज ते नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर अशा पश्चिम प्रांताचे महामंत्री आहेत. सुमारे साठ बाल संस्कार केंद्रे यातून चालवली जातात आणि त्यातून मुलांना संस्कृत शिकविले जाते.
इन्फो..
कोरोना काळात देखील ऑनलाईन वर्ग घेणाऱ्या अंभोरे यांनी आता नाशिक जिल्ह्याच्या पेठ-सुरगाणा, इगतपुरी त्र्यंबक येथेही समित्या स्थापन करून विनामूल्य संस्कृत शिकविण्याचे काम सुरू केले आहे. नाशिकमध्ये दर आठवड्याला संस्कृत व्याख्यान, ज्या कुटुंबात सर्वच जण दैनंदिन व्यवहार संस्कृतमध्ये करतात, त्या संस्कृत कुटुंबाचे महिन्यातून एकदा स्नेह मिलन असे अनेक उपक्रम राबवीत आहेत.
कोट..
संस्कृत शिकल्याशिवाय संस्कृती कळणार नाही आणि त्यामुळे जगातील जे शोध भारतात लागले, तेच ज्ञात नसल्यानेे नवीन पिढी पाश्चात्त्य संशोधकांचे शोध हेच अंतिम मानते. त्यामुळे भावी पिढीला संस्कृत भाषा शिकविणे आवश्यकच आहे.
- गजानन अंभाेरे, संस्कृत भाषा प्रचारक.