ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी एचएएलकडून रुग्णवाहिका भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:16 AM2021-05-06T04:16:23+5:302021-05-06T04:16:23+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला तत्काळ रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी या रुग्णवाहिकांची मागणी केलेली होती. ...

Ambulance gift from HAL for rural health centers | ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी एचएएलकडून रुग्णवाहिका भेट

ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी एचएएलकडून रुग्णवाहिका भेट

Next

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला तत्काळ रुग्णसेवा उपलब्ध व्हावी यासाठी या रुग्णवाहिकांची मागणी केलेली होती. एच. ए. एल. हॉस्पिटलमध्ये झालेल्या छोटेखानी लोकार्पण कार्यक्रमात या रुग्णवाहिका एच. ए. एल.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (मिग समूह) बीएथ. व्ही. शेषगिरीराव यांचे हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेमार्फत स्वीकारल्या. याप्रसंगी क्षीरसागर यांनी एच.ए.एल. व्यवस्थापनाचे आभार मानले तसेच ह्या रुग्णवाहिकांचा वापर ग्रामीण व अदिवासी भागातील रुग्णांसाठी जास्तीत जास्त केला जाईल असे आश्वासन दिले. सदर रुग्णवाहिका या जिल्हा परिषदेने त्यांच्या निफाड, चांदवड व दिंडोरी तालुक्यातील आरोग्य केंद्रांना वाटप केल्या आहेत. याप्रसंगी एच.ए.एल. नासिक विभागाचे महाप्रबंधक ए. बी. प्रधान (मानव संसाधन) दीपक सिंघल (ए.एम.डी.), एस. के. मेहता (वित्त), साकेत चतुर्वेदी (ए.ओ.डी.), उत्तम सलावदे (ए.यु.आर.डी.सी.) तसेच जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

फोटो - ०५ एचएएल हेल्प

ओझर: एच.ए .एल. नाशिक विभागातर्फे ४ अद्ययावत लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्याकडे सुपुर्द करताना एच.ए.एल. नाशिक विभागाचे महाप्रबंधक ए. बी. प्रधान, दीपक सिंघल, एस. के. मेहता, साकेत चतुर्वेदी , उत्तम सलावदे आदी.

===Photopath===

050521\05nsk_50_05052021_13.jpg

===Caption===

फोटो - ०५ एचएएल हेल्प ओझर:एच.ए.एल. नाशिक विभागातर्फे ४ अद्ययावत लाईफसपोर्ट रुग्णवाहिका  जि प अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्याकडे सुपुर्द करताना एच.ए.एल. नाशिक विभागाचे महाप्रबंधक ए. बी. प्रधान,  दिपक सिंघल,  एस. के. मेहता,  साकेत चर्तुवेदी ,  उत्तम सलावदे आदी. 

Web Title: Ambulance gift from HAL for rural health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.