आरटीओकडून रुग्णवाहिकांचे दर निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:15 AM2021-05-15T04:15:14+5:302021-05-15T04:15:14+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढली. रुग्णांना कमी वेळात रुग्णालय, स्कॅन सेंटरपर्यंत पोहचविण्यासाठी रुग्णवाहिकांना प्राधान्य दिले जात आहे. ऑक्सिजन ...

Ambulance rates fixed by RTO | आरटीओकडून रुग्णवाहिकांचे दर निश्चित

आरटीओकडून रुग्णवाहिकांचे दर निश्चित

Next

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढली. रुग्णांना कमी वेळात रुग्णालय, स्कॅन सेंटरपर्यंत पोहचविण्यासाठी रुग्णवाहिकांना प्राधान्य दिले जात आहे. ऑक्सिजन सेवा असलेल्या रुग्णवाहिकांना तसेच विनाऑक्सिजनच्या रुग्णवाहिकांना मागणी वाढली. दरम्यान, बहुतांश रुग्णवाहिकांच्या चालकांकडून जादा रक्कम परिस्थितीचा गैरफायदा म्हणून आकारली जात असल्याच्या तक्रारी राज्यात वाढल्या. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षीच प्रादेशिक परिवहन विभागाला आदेशित करत रुग्णवाहिकांसाठी दार निश्चित करावे, असा निकाल दिला होता. हे दरपत्रक आरटीओच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जावे, अशी सूचनाही न्यायालयाने केली होती. या आदेशानुसार उशिरा का होईना नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाला जाग आली आणि रुग्णवाहिकांसाठी दार निश्चित करण्याकरिता ''''मुहूर्त'''' मिळाला. विविध अटीशर्थींसह रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. यामुळे आता काही प्रमाणात आपत्कालीन स्थितीत रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला आहे. अवाच्या सव्वा होणारी लूट थांबेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आरटीओने दरपत्रक जारी करण्याबरोबरच त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत आहे किंवा नाही, याकडेही लक्ष ठेवण्याची मागणी होत आहे. एखाद्या रुग्णवाहिकाच्या चालकाकडून जादा रकमेची मागणी होत असल्यास किंवा त्यासाठी अडवणूक केली जात असेलतर थेट आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.

----इन्फो----

...असे आहेत दरपत्रक (तक्ता)

वाहनांचा प्रकार - २५ किमी/ २ तासांसाठी

1) मारुती ओम्नी / इको (नॉन ए.सी) - ६०० रुपये

2) टाटा सुमो किंवा जीपसदृश वाहन (नॉन ए.सी)- ७०० रुपये

3) टेम्पो ट्रॅव्हलर/छोटा टेम्पो/मोठा ४०७ टेम्पो च्या साठ्यावर बांधणी केलेली रुग्णवाहिका (नॉन ए.सी) - ९२० रुपये.

4) आयसीयू कार्डियाक वातानुकूलित रुग्णवाहिका : ११५० रुपये.

-----

रकाना (२) प्रतिदिन २४ तासांकरिता अनु.क्रमांक नुसार -

1) १२०० रुपये

2) १४०० रुपये

3) १८५० रुपये

4) २३०० रुपये

------

रकाना (३) प्रति किलोमीटर (रुपये)

1) १३ 2) १४ 3) १५ 4) २३

:

Web Title: Ambulance rates fixed by RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.