रुग्णवाहिका सेवा गर्भवतींसाठी ठरली नाशकात देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:10 PM2018-08-18T23:10:27+5:302018-08-18T23:11:15+5:30
आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी उपलब्ध केलेल्या १०८ क्रमांकाच्या टोल फ्री सेवेमुळे मिळणारी रुग्णवाहिका सुविधा आदिवासी भागात गर्भवतींसाठी वरदान ठरली आहे.
- अझहर शेख
नाशिक : आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी उपलब्ध केलेल्या १०८ क्रमांकाच्या टोल फ्री सेवेमुळे मिळणारी रुग्णवाहिका सुविधा आदिवासी भागात गर्भवतींसाठी वरदान ठरली आहे. जिल्ह्यात ४६ रुग्णवाहिकांत आहेत. चार वर्षांमध्ये जिल्ह्यातील सुमारे ४६ हजार ७७१ गर्भवती महिलांच्या मदतीला ‘१०८’ रुग्णवाहिका देवदूतासारखी धावून आली आहे.
१३ प्रकारच्या वैद्यकीय स्थितीत चार वर्षांत एक लाख ३७ हजार ४२२ रुग्णांना रुग्णालयात पोहचविण्यास जिल्ह्यातील रुग्णवाहिकांना यश आले आहे. चार वर्षांमध्ये एक लाख ३७ हजार ४२२ रुग्णांना रु ग्णालयापर्यंत पोहोचविण्यास यश आल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ. अश्विन राघमवार यांनी ‘लोकमत’ला दिली. जिल्ह्यात ११ रुग्णवाहिका ‘मिनी आयसीयू’ आहेत. सर्वच रुग्णवाहिकांसोबत चालक आणि एक डॉक्टर कायमस्वरूपी असतो.