रुग्णवाहिकांवर आता ‘जीपीएस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 01:14 AM2020-08-07T01:14:05+5:302020-08-07T01:14:48+5:30
कोरोना काळात रुग्णवाहिका आणि शववाहिका वेळेत मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन या दोन्ही वाहनांना जीपीएस लावण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे.
नाशिक : कोरोना काळात रुग्णवाहिका आणि शववाहिका वेळेत मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन या दोन्ही वाहनांना जीपीएस लावण्याचा निर्णय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे.
शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी या सूचना देतानाच नागरिकांची गरज लक्षात घेऊन तीस प्राथमिक आरोग्य केंद्रांवरदेखील रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. शहरात रुग्णवाहिका तसेच शववाहिका मिळत नसल्याच्या नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहने ट्रॅक करून नियंत्रण आणण्यासाठी घंटागाड्यांप्रमाणेच जीपीएस लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.