अमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’मध्ये चांदवड, सिन्नरची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:13 AM2017-12-06T00:13:09+5:302017-12-06T00:25:14+5:30
नाशिक : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या ‘पानी फाउण्डेशन’च्या सत्यमेव जयते उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील कायमच पाणीटंचाईचा सामना करणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये पानी फाउण्डेशनच्या वतीने ‘वॉटर कप’ स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी चांदवड व सिन्नर तालुक्यात जलसंधारण व मृदसंधारणाची कामे हाती घेण्यात येतील व उत्कृष्ट काम करणाºया ग्रामपंचायतींना तब्बल ७५ लाखांचे बक्षीस पटकाविण्याची संधी दिली जाणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पानी फाउण्डेशनच्या वतीने राज्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांमध्ये विविध कामे घेतली जात असून, त्याचे दृश्य स्वरूपात परिणामही दिसू लागले आहेत. यंदा पाणी फाउंडेशनने जलसंधारण व मृदसंधारणाची अधिकाधिक चांगली कामे करणाºया राज्यातील ७५ तालुक्यांमध्ये स्पर्धा भरवून त्यानिमित्ताने पाणी साठवणूक, वापर व उपयोगाबाबत जनजागृतीला हातभार लावला जाणार आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्णात कायमच टंचाईला सामोरे जावे लागणाºया चांदवड व सिन्नर या दोन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही गावांमधील प्रत्येक ग्रामपंचायतीला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाºया ग्रामपंचायतींनी १० जानेवारीपर्यंत ग्रामसभा घेऊन तसा ठराव करून पाणी फाउंडेशनला सादर करावा लागणार आहे. सहभागी होणाºया ग्रामपंचायतीने गावातील कोणत्याही पाच व्यक्तींची नावेही फाउंडेशनला कळवायची असून, फाउंडेशनच्या वतीने चार ते पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यात जवळपास ४५ ते ५० ठिकाणी फाउंडेशन प्रशिक्षण सेंटर सुरू करणार आहे. या शिबिरात सहभागी होणाºया शिबिरार्थींचा प्रवास, राहण्याची, खाण्याची व निवासाची सोय फाउंडेशन करणार असून, शिबिरार्थींना कामाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
येत्या ८ एप्रिल ते २२ मे या ४५ दिवसांच्या कालावधीत स्पर्धेत सहभागी होणाºया ग्रामपंचायतींनी शासकीय योजनांच्या माध्यमातून गावात जलसंधारण व मृदसंधारणाची कामे करायची आहेत. या कामांसाठी मात्र फाउण्डेशन कोणतीही आर्थिक मदत करणार नाही. त्यासाठी लोकसहभाग, लोकवर्गणी, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करावी लागणार असून, पानी फाउण्डेशन या स्पर्धेचा निकाल घोषित करेल. राज्यात पहिल्या येणाºया तालुक्याला ७५ लाख, द्वितीय ५० व तृतीय ४० लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तालुक्यात पहिल्या येणाºया ग्रामपंचायतीला १० लाख बक्षीस देण्यात येईल.