अमेरिकन नागरिकांना नाशकातून गंडा; कॉल सेंटर उद्ध्वस्त करीत ७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 05:23 IST2025-02-16T05:22:52+5:302025-02-16T05:23:22+5:30
धाड टाकून बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करीत ७ जणांना अटक केली.

अमेरिकन नागरिकांना नाशकातून गंडा; कॉल सेंटर उद्ध्वस्त करीत ७ जणांना अटक
नाशिक : एका बंगल्यात भाडेतत्त्वावर राहणाऱ्या सहा युवक व एका युवतीने अमेरिकेतील १५० नागरिकांना तब्बल १ कोटी ९२ लाख रुपयांची (२ लाख २४ हजार डॉलर) फसवणूक केल्याचा प्रकार सायबर पोलिसांनी उघडकीस आणला. धाड टाकून बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करीत ७ जणांना अटक केली.
गुप्त दरवाजातून आत, ७ जणांना बेड्या
बंगल्यातील अंतर्गत रचना बघून पथकही चक्रावले. पुस्तके ठेवण्याची मांडणी भासणाऱ्या लाकडी रचनेवर गुप्त दरवाजा होता. तो उघडून पोलीस आत गेले. तेथे कॉल सेंटर होते.
प्रणय जैस्वाल (३०), मुकेश पालांडे (४०, रा. नालासोपारा), साहिल खोकोन शेख (२४, रा. मालाड), आशिष ससाणे (२८, रा. सांताक्रुझ), चांद बर्नवाल (२७, रा. मीरा रोड), सादिक अहमद खान (२४, रा. मालाड), समीक्षा सोनवणे (२४, ठाणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.