अमित शाह यांचा दौरा रद्द; नित्यानंद राय येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 01:33 AM2022-06-20T01:33:06+5:302022-06-20T01:33:33+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा त्र्यंबकेश्वर दौरा ऐनवेळी रद्द झाला असून, आता केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत शाह यांच्या दौऱ्याविषयीची अनिश्चिता होती. अखेर दौरा रद्द झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Amit Shah's tour canceled; Nityanand Rai will come | अमित शाह यांचा दौरा रद्द; नित्यानंद राय येणार

अमित शाह यांचा दौरा रद्द; नित्यानंद राय येणार

googlenewsNext

नाशिक : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा त्र्यंबकेश्वर दौरा ऐनवेळी रद्द झाला असून, आता केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत शाह यांच्या दौऱ्याविषयीची अनिश्चिता होती. अखेर दौरा रद्द झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. दरवर्षी २१ जून रोजी आंतराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने केंद्राच्या वतीने देशभरातील ७५ धार्मिक, पौराणिक ठिकाणी योगदिन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारात योगदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हेाते. त्यांच्या दौऱ्यानिमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात होती. सध्या देशातील अनेक भागात ‘अग्निपथ’ योजनेवरून तरुणांकडून रोष व्यक्त केला जात असल्याने अनेक राज्ये संवेदनशील बनले आहेत. या पार्श्वभूमीवर शाह नाशिक दौऱ्यावर येणार की नाही याविषयीचा प्रश्न निर्माण झाला होता. रविवारी दुपारपासून याबाबतची चर्चा सुरू असताना जिल्हा आणि पोलीस प्रशासनडी संभ्रमात होते. अखेर केंद्रीय राखीव पोलीस दलाने जिल्हा प्रशासनाला याबाबतची माहिती दिल्याने शाह यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शाह यांचा दौरा रद्द झाला असला तरी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत नियोजित कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Amit Shah's tour canceled; Nityanand Rai will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.