अंबडमध्ये एका बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 04:27 PM2019-04-13T16:27:09+5:302019-04-13T16:28:24+5:30

अंबडलिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात घाटोळ मळ्याजवळ अमोल पडवी या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी एकत्र हल्ला चढविला. या हल्ल्यात बालकाला मोठी दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

An ammunition in the Ambad is a leopard attack | अंबडमध्ये एका बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

अंबडमध्ये एका बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देमोकाट श्वानांची वाढती संख्येला कचरा डेपो कारणीभूत

सिडको : पाच दिवसांपूर्वी इंदिरानगरमधील राजीव टाउनशिपजवळ भटक्या श्वानाने धुमाकूळ घालत एक दोन नव्हे तर तब्बल पाच नागरिकांना चावा घेत जखमी केल्याची घटना ताजी असताना पुन्हा अंबडमध्ये एका बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मोकाट श्वान नियंत्रण मोहिमेचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.
मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. शहरातील उपनगरीय भागात ही समस्या गंभीर होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. सिडको, अंबड, सातपूर, उपनगर, इंदिरानगर, वडाळागाव, डीजीपीनगर, जुने नाशिक आदी भागांमध्ये मोकाट श्वानांंच्या संख्येत वाढ झाली आहे. अंबडलिंक रोड परिसरातील संजीवनगर भागात घाटोळ मळ्याजवळ अमोल पडवी या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी एकत्र हल्ला चढविला. या हल्ल्यात बालकाला मोठी दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. श्वानांंनी हल्ला चढविल्यानंतर परिसरात सर्वत्र गोंधळ उडाला. नागरिकांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर दगड व लाठ्या-काठ्या घेऊन नागरिकांनी कुत्रे पळवून लावल्याने बालकाचा जीव वाचला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
इंदिरानगर, पाथर्डी, अंबड या परिसरांत मोकाट श्वानांची वाढती संख्येला कचरा डेपो कारणीभूत आहे. कचरा डोपोच्या आवारात कुठल्याहीप्रकारचे कुंपण नसल्यामुळे या भागात सर्रासपणे श्वानांच्या झुंडी वावरत असतात. तेथून जवळच्या लोकवस्तीत कुत्र्यांचा शिरकाव होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: An ammunition in the Ambad is a leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.