मोबाइल टाॅवर कंपनीचा आमोदे ग्रामपालिकेला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:29+5:302021-09-27T04:15:29+5:30
एका कंपनीने मोबाइल टाॅवर आमोदे गावात उभारणीसाठी ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार जागेची पाहणी करण्यात आली होती. तसेच त्यासाठी ...
एका कंपनीने मोबाइल टाॅवर आमोदे गावात उभारणीसाठी ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार जागेची पाहणी करण्यात आली होती. तसेच त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी आवश्यक असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पंचायत समिती नांदगाव यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र या कालावधीत कंपनीने ग्रामपालिका प्रशासनाला न विचारता एका खासगी जागेवर टाॅवर उभारणीचा निर्णय घेऊन ठेंगा दाखवल्याने कंपनीविरोधात ग्रामपालिका प्रशासनाने दंड थोपटले आहे. सदर कंपनीकडे पुन्हा पत्रव्यवहार करून टाॅवर ग्रामपालिकेच्याच जागेवर होईल अन्यथा होणार नाही, असा इशारा दिला आहे. ग्रामपालिकेच्या जागेवर सदर टाॅवर झाल्यास त्यापासून पंचायतीला कर स्वरूपात उत्पन्न मिळणार आहे. मात्र कंपनीने रेंज मिळत नसल्याचे कारण पुढे करून खासगी जागेची निवड करून परवानगीसाठी पुन्हा ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार केला आहे. यावर ग्रामपंचायत काय निर्णय घेते याकडे संपूर्ण गावाचे रक्षण लागून आहे.
कोट.....
सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाइल टाॅवरसाठी ग्रामपालिकेच्या मालकीच्या जागेला पसंती दिली. मात्र थोड्याच दिवसात तांत्रिक अडचण दाखवून खासगी जागेची निवड केली. मात्र ग्रामपालिका प्रशासन तशी कोणतीही परवानगी देणार नाही.
- वैशाली पगार, सरपंच, आमोदे