जनपदोध्वंस टाळण्यासाठी आयुर्वेदाची मात्रा उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 06:30 PM2020-04-18T18:30:58+5:302020-04-18T18:35:26+5:30

सध्या कोरोना या महामारीने जगावर संकट आले आहे . भारतात त्या मानाने प्रगत देशांइतकी स्थिती नसली तरी अशाप्रकारचे व्यापक पध्दतीने हाहाकार माजवणाऱ्या आजारांचा आयुर्वेदात (चरक संहितेत) उल्लेख आहे. कोराना संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, यासाठी सध्या जागतिक आरोग्य संघटनेसह अन्य अनेक संघटना उपाय सुचवत असल्या तरी आयुर्वेदात आरोग्याबाबत पूर्व दक्षता घेण्याची मात्र आहेच. तीच आता नव्या पध्दतीने आधुनिक पध्दतीने सांगितली जात आहे.

The amount of Ayurveda is good for preventing mass destruction | जनपदोध्वंस टाळण्यासाठी आयुर्वेदाची मात्रा उत्तम

जनपदोध्वंस टाळण्यासाठी आयुर्वेदाची मात्रा उत्तम

Next
ठळक मुद्देचरक संहितेत उल्लेखदिनचर्या न पाळण्याचे परीणाम

सध्या कोरोना या महामारीने जगावर संकट आले आहे . भारतात त्या मानाने प्रगत देशांइतकी स्थिती नसली तरी अशाप्रकारचे व्यापक पध्दतीने हाहाकार माजवणाऱ्या आजारांचा आयुर्वेदात (चरक संहितेत) उल्लेख आहे. कोराना संसर्ग टाळण्यासाठी काय करावे, यासाठी सध्या जागतिक आरोग्य संघटनेसह अन्य अनेक संघटना उपाय सुचवत असल्या तरी आयुर्वेदात आरोग्याबाबत पूर्व दक्षता घेण्याची मात्र आहेच. तीच आता नव्या पध्दतीने आधुनिक पध्दतीने सांगितली जात आहे.
चरक संहितेत जनपदोध्वंसनीय विमान नावाचा अध्याय आहे. जनपदोध्वंस म्हणजे आजच्या वैद्यकाच्या दृष्टीने एपीडेमीक! करोना हा त्याचेच एक रूप. आता हा जनपदोध्वंस का होतो? तर दूषित वायू, जल, देश आण िकाल यांमुळे. यांची मारकता उत्तरोत्तर अधिक सांगितली आहे. थोडक्यात काळ आला असला तर कोणाचाही इलाज नाही! दिनचर्या-ऋतुचर्या न पाळणं, प्रदूषण हे सारे त्याचेच परीणाम आहे.
वाग्भट सांगतात;

नीचरोमनखश्मश्रुर्निर्मलाङ्घ्रिमलायन: ।
स्नानशील: सुसुरिभ: सुवेषो अनुल्बणोज्ज्वल:।।

म्हणजेच शरीरावरील केस, नख, दाढी यांचे नियमित कर्तन करावे, गुदद्वारादी ठिकाणे स्वच्छ असावीत, नियमित स्नान आणि सुगंध धारण करावे.
पुढे ते म्हणतात,

नासंवृतमुख: कुर्यात्क्षुतिहास्यविज्रु म्भणम

म्हणजेच, तोंडाला न झाकता शिंकणे, हसणे व जांभया देणे टाळावे.

नासिकां न विकुष्णीयात।
अर्थात, नाक कोरु नये, असेही नमूद आहे.

करोना येइपर्यंत आपण या गोष्टींना किती गांभीर्यानं घेतलं? प्रतिबंध हा उपचारापेक्षा महत्वाचा ही शिकवण जगाला सर्वप्रथम देणाºया आयुर्वेदाची आपणच उपेक्षा केली. आता मात्र जगाला आयुर्वेद प्रकर्षाने आठवतो आहे. जनपदोध्वंस समयी काय प्रतिबंध करावा, याला जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या नियमावलीस आयुर्वेदाचा आधार देत पुढिल गोष्टी आपण करू शकतो
१. कामासाठी बाहेर निघताना दोन्ही नाकपुड्यांत कोमट केलेल्या देशी गायीच्या साजूक तुपाचे दोन- दोन थेंब टाकणे. (सर्दी असल्यास टाळावे.)
२. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे.
३. कामावरून घरी आल्यावर कडकडीत पाण्याने अंघोळ करणे.
४. घरामध्ये कडुनिंब, धूप, देशी गायीच्या शेणाच्या गोवºया, भीमसेनी कापूर असा धूप घालणे. (खोकला येत असणाºया व्यक्तींपासून दूर ठेवावे.)
५. आपल्याला सर्दी-खोकला झाला असल्यास रु मालाचा वापर करणे, सर्दी खोकला झालेल्या व्यक्तींशी बोलताना जास्त जवळ न जाणे.
६. सकाळच्या वेळी कपभर देशी गायीच्या गरम दुधात हळद इतरांचे उष्टे खाणे, चहा इत्यादीचे सेवक सक्तीने टाळावे.
७. भाज्या आणि फळे व्यविस्थत धुवून मगच वापरावी. बाहेर मिळणारे पदार्थ टाळावे.
८. नाक, तोंड आणि डोळे यांना शक्यतो हाताने स्पर्श करू नये. करायचा झाल्यास हात स्वच्छ धुतले असल्याची खात्री करावी.
९. सध्या काहीकाळ तरी सर्दी-खोकला-ताप अशी लक्षणे दिसल्यास आपल्या वैद्यांना त्वरीत भेटणे.

जनपदोध्वंसावर काही उपाय आहे का या प्रश्नावर चरक सांगतात; अर्हता पाहून पंचकर्म देणे आणि त्यानंतर रसायन चिकित्सा घेत राहणे हा उत्तम उपाय आहे. च्यवनप्राश दीर्घकाळ सेवन करण्याची गोष्ट आहे; आपल्या वैद्यांना भेटून आयुर्वेदाला अपेक्षीत दिनचर्या-ऋतुचर्या जाणून घ्या आणि आचरणात आणायला सुरु वात करा. जगभरात संशोधन करून आज हे सांगितलं जात आहे की, प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाची मारकता घटेल. आयुर्वेद हे कित्येक शतकं सांगतोय
कोणीही घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास ठेवून नाही आपली प्रतिकारशक्ती कशी चांगली राहील याचा विचार करावा घरचे सकस ताजे बनवलेलं जेवण घ्यावे, पुरेशी झोप माफ घरात करतील असा व्यायम करावा तसेच आपली मनस्थिती चांगली राहावी म्हणून आवडते छंद पूर्ण करावेत आवडीचं संगीत ऐका व म्हणजे मन प्रसन्न राहते.

घरातील ज्येष्ठ व्यक्तीने मन प्रसन्न राहण्यासाठी मन गुंतून राहण्यासाठी आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात त्यांमध्ये रमावे तसेच बालकांनी विविध सर्जनात्मक खेळ खेळावेत म्हणजे दिवसभर काय करावे हा प्रश्न सतावणार नाही सर्वांनी एकमेकाला समजून घेऊन कौटुंबिक वातावरण छान उत्साहपूर्ण कसा राहील याची काळजी घ्यावी. जेवणामध्ये साजूक तूप तसेच वरण भात भाकरी पोळी असा आहार हवा,लिंबू मीठ साखर पाणी आवळा सरबत कोकम सरबत चिंचेचे पन्हे विशेषत: घ्यावे. त्यामुळे शरीरातील क्षार व पाणी यांच्या प्रमाण संतुलित होऊन क जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात मिळते.

महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने रात्री लवकर झोपावे पहाटे लवकर उठून सर्व अंगाला तेलाने मालिश करून दीर्घ श्वसन प्राणायाम योगासन करणे आवश्यक आहे. नियमीतपणे आरोग्याकडे लक्ष पुरवले तर अशा आपत्काळात वेगळी काळजी घेण्याची गरज पडत नाही.

- वैद्य राहूल सावंत, नाशिक

 

Web Title: The amount of Ayurveda is good for preventing mass destruction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.