शिक्षण संस्थाचालकास ५२ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 11:45 PM2020-03-07T23:45:10+5:302020-03-07T23:46:51+5:30
नाशिक : औरंगाबाद येथील शिक्षण संस्थाचालकास नाशिकच्या दोघांनी तब्बल ५२ लाख रुपयांचा गंडा घातला. रुग्णालय आणि मुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची गरज असल्याचे भासवून संस्थाचालकांचा वेळोवेळी विश्वास संपादन करून हा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : औरंगाबाद येथील शिक्षण संस्थाचालकास नाशिकच्या दोघांनी तब्बल ५२ लाख रुपयांचा गंडा घातला. रुग्णालय आणि मुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांची गरज असल्याचे भासवून संस्थाचालकांचा वेळोवेळी विश्वास संपादन करून हा
गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी औरंगाबाद येथील शिक्षण संस्थाचालक जगन्नाथ खंडेराव जाधव यांनी गणेश जयराम जगताप, रा. बडेबाबा मंदिर, वडाळा-पाथर्डी रोड व वसंत जगन्नाथ पाटील, रा. नाशिक या दोघा संशयितांविरुद्ध तक्रार दिली
आहे.
जाधव यांची औरंगाबाद येथे भारतीय ग्रामीण पुनर्रचना नावाची शैक्षणिक संस्था असून, या संस्थेमार्फत मुंबईत व औरंगाबाद जिल्ह्यात ४० विद्यालये आणि २० महाविद्यालये चालविली जातात. त्यांचे मुंबईचे मित्र कमलाकर दुबे यांच्या माध्यमातून गणेश जगताप ऊर्फ बाबाजी यांच्याशी संपर्क आला. त्यावेळी जगताप यांनी रुग्णालय, मुलींसाठी वसतिगृह, शाळा आणि मंदिर उभारायचे असून, त्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
इतक्या किमतीचे सोने आपल्याकडे आहे, पण त्यासाठी एक यज्ञ करावा लागेल व त्यानंतर सोने मोडून रक्कम उभी करता येईल, असे सांगून गणेश जगताप यांनी जाधव यांच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. यज्ञ केल्यानंतर महिनाभरात सोने विक्री करून त्यांची रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जाधव यांनी प्रारंभी २० लाख रुपये दिले.
पुन्हा दोन दिवसांनी जगताप हे औरंगाबाद येथे जाधव यांच्याकडे गेले त्यांच्यासमवेत सिडकोतील कामटवाडा येथील अमृतधारा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत पाटील होते.
अमृतधारा पतसंस्थेत जगताप यांनी पाच कोटी रुपये फिक्स डिपॉझिट ठेवले असल्याचे सांगून एफडीची मुदत संपल्यावर पैसे परत करू या बोलीवर पुन्हा ३० लाख रुपये जाधव यांच्याकडून घेतले.
सदरचा प्रकार गेल्या वर्षी मे महिन्यात घडला. परंतु मुदत टळूनही पैसे परत मिळत नसल्याचे पाहून जाधव यांनी तगादा लावला असता, आपण फसविलो गेल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. नोकरीच्या नावेही फसवणूक
जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, जगताप यांनी अनेक लोकांना रेल्वेत नोकरी लावून देतो म्हणून वेळोवेळी मोठी रक्कम उकळली आणि बनावट नियुक्तीपत्रे दिली, अशी माहिती आपल्याला मिळाली आहे. जगताप यांच्या संपूर्ण व्यवहारांची चौकशी केल्यास लाखो रुपयांच्या फसवणुकीचा भंडाफोड होईल.