केरळमधून येणाऱ्या मसाल्याचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:20 AM2018-08-28T01:20:51+5:302018-08-28T01:21:08+5:30
केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे भुसार बाजारात वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांच्या आवकेवर परिणाम झाला असून, आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीच्या भावात प्रतिकिलोमागे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नाशिक : केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे भुसार बाजारात वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांच्या आवकेवर परिणाम झाला असून, आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीच्या भावात प्रतिकिलोमागे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. केरळ राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे येथील उत्पादनावर परिणाम झाला असून, आगामी काळात या सर्व मसाल्याच्या पदार्थांच्या भावात तेजी येण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे. केरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये विलायची, काळी मिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीसोबत लवंग, खोबरे, दालचिनी यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन घेतले जाते. याखेरीज तामिळनाडू, कर्नाटकमध्येही या पिकांचे उत्पादन घेण्यात येते. मात्र, केरळच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यात विलायची आणि जायफळाचा हंगाम जोरात सुरू होता. या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र, जोरदार पावसाने शेतकºयांचे हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फिरले आहे. दरम्यान, काळी मिरी आणि सुंठाचे उत्पादन यापूर्वी शेतकºयांनी घेतले असून बहुतांश मालाचा गुदाममध्ये साठा करून ठेवण्यात आला होता. मात्र, केरळमधील पूरपरिस्थितीमुळे गोदामांमध्ये पाणी शिरल्याने ७० ते ८ ० टक्क्यांहून अधिक माल भिजला असून, त्याचा मोठा फटका मसाल्याच्या बाजारपेठांना बसला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून भुसार बाजारात मसाल्याच्या वस्तूंची आवक झाली नसल्याचे व्यापारी सांगत असून आगामी काळातही आवक वाढण्याची शक्यता कमी आहे. येणाºया दिवसांमध्ये मसाल्याच्या पदार्थांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे घाऊक व्यापाºयांकडून सांगण्यात येत आहे.
खोबरेल तेलाची आवकही घटली
केरळमधील पुरामुळे तेथून होणाºया मसाल्यांची व खोबरेल तेलाची आवक कमी झाल्यामुळे या वस्तूची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. खोबरेल तेलाची केरळमधून होणारी आवक थांबली तरी राज्यात व्यापाºयांकडे साठा आहे. अन्य राज्यांतूनही तेल येत असल्याने किमती स्थिर आहेत. पण केरळातील स्थिती सुधारली नाही, तर खोबरेल तेल महागण्याची शक्यता व्यापा-यांनी व्यक्त केली आहे.
केरळ येथील गुदामांमध्ये साठविलेला माल भिजला असून हाती आलेले पीकही नष्ट झाल्याने येत्या काळात केरळ येथून होणाºया मसाल्यांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात भावात कोणत्याही प्रकारची घट होण्याची शक्यता नाही. - बाबुभाई पटेल, संचालक, श्री वाराही ट्रेडिंग कंपनी