कोरोनाच्या धास्तीवर ‘योगा’ची मात्रा प्रभावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:47 PM2020-06-20T22:47:07+5:302020-06-20T22:47:38+5:30
नाशिक : दशकाच्या प्रारंभापासून योगाचा वाढू लागलेला प्रसार आणि आंतरराष्टÑीय योग दिन साजरा होऊ लागल्यापासून त्याच्या प्रसारात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदतच झाली होती. मात्र, तरीदेखील जे नागरिक वेळेअभावी योगाकडे दुर्लक्ष करीत होते आणि प्राणायाम करणे टाळत होते, अशा नागरिकांनादेखील कोरोनाच्या धास्तीने योगा, प्राणायामकडे वळण्यास भाग पाडल्याचे चित्र गत तीन महिन्यांत दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

सध्याच्या काळात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतो. त्यात कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यापासून आपली प्रतिकारशक्ती चांगली रहावी, किमान आपल्याला तरी कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून एप्रिलपर्यंत ज्यांनी कधीही फारशी योगासने केलेली नव्हती, अशा व्यक्तीदेखील सहकुटुंब योगासने करू लागली आहेत. कोरोनाच्या कालावधीत अनेक नागरिकांना आपली नोकरी टिकण्याचे तसेच धंदा पुन्हा किमान पूर्ववत चालेल की नाही, अशा रोजीरोटीच्या समस्यांनी ग्रासले आहे. अशा प्रकारच्या ताणतणावांमुळे स्वास्थ्य बिघडते. त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळते. त्यामुळे एप्रिल आणि मेचा पूर्ण महिना घरी थांबाव्या लागलेल्या नागरिकांनी किमान सकाळी तरी तासभर योगासने करण्यावर भर दिला.आॅनलाइन योगादेखील जोरात
काही योगशिक्षकांनी या कालावधीत आॅनलाइन योगा प्रशिक्षणाचेदेखील धडे दिले. अशा आॅनलाइन योग प्रशिक्षणांनादेखील खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. विशेष म्हणजे गत तीन महिन्यांत त्यात सातत्याने वाढ झाल्याने आॅनलाइन योगासने प्राणायाम शिकण्याचे प्रमाणदेखील खूप वाढले आहे.सध्याच्या कोरोनाच्या काळात तर प्रत्येक नागरिकासाठी योगासने आणि प्राणायाम अत्यंत आवश्यक बनले आहेत. या काळात नागरिकांनी फुप्फुसाची क्षमता वाढवणारी भुजंगासन, धनुरासन, उष्टÑासन यांसारखी योगासने अधिक उपयुक्त ठरू शकतील. तसेच प्राणायामात दीर्घ श्वसन, अनुलोम-विलोम, भ्रामरी, भस्त्रिका यांसारखे प्रकार प्रत्येकाला निरोगी ठेवण्यास अधिक सहाय्यभूत ठरतील.
- विश्वास मंडलिक, योगाचार्य