राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार भाजपात, दुपारी करणार प्रवेश
By संजय पाठक | Published: March 14, 2023 11:21 AM2023-03-14T11:21:47+5:302023-03-14T11:23:46+5:30
माजी मंत्री छगन भुजबळ अन्याय करीत असल्याचा आरोप
नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार (कै.) डॉ. वसंत पवार यांची कन्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अमृता पवार या भाजपामध्ये प्रवेश करणार असून आज दुपारी मुंबईमध्ये प्रवेश पार पडणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अन्यायामुळे आपण हा पक्ष सोडत असल्याचे अमृता पवार यांनी सांगितले.
अमृता पवार या जिल्हा परिषदेच्या देवगाव गटातील माजी सदस्य आहेत नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे माजी आमदार (कै) वसंत पवार तसेच मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या त्या कन्या आहेत. आपल्या जिल्हा परिषद गटात कामे करण्यासाठी निधी दिला नाही कामे झालीच तर माजी पालकमंत्री छगन भुजबळ त्याचे श्रेय घेतात त्यामुळे पक्ष सोडत असल्याचे अमृता पवार यांनी सांगितले