निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने उभारली कांदे-द्राक्षाची गुढी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:51 PM2023-03-22T13:51:33+5:302023-03-22T13:52:39+5:30

मागील काही दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने द्राक्षे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

An Onion Grape Gudhi was set up by a farmer in Niphad taluka gudhi padwa | निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने उभारली कांदे-द्राक्षाची गुढी

निफाड तालुक्यातील शेतकऱ्याने उभारली कांदे-द्राक्षाची गुढी

googlenewsNext

नैताळे (जि नाशिक) - निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी चक्क कांदा, लसूण व द्राक्षे यांची गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्षे उत्पादन घेतले जाते. मात्र मागील काही दिवसात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने द्राक्षे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याच्या वल्गना करीत असले तरी अद्याप नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले नाही. या हंगामात कांदे मातीमोल भावात विकावे लागले होते. नैताळे येथीलच एक शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर फिरवला होता. संजय साठे हे प्रगतीशील शेतकरी असून त्यांनी बराक ओबामा यांची भेट घेऊन शेतीविषयक चर्चा केली होती. त्यांनी कांदे विकून मिळालेल्या अल्प रकमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानिऑर्डर तर कधी टोपी उपरणे पाठवून त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

त्याचप्रमाणे त्यांनी लसूण, कांदा व द्राक्षे यांची गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असून तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे मी माझ्या शेतात पिकलेल्या द्राक्षे, कांदा व लसूण यांची गुढी उभारली आहे. अवकाळी पाऊस व गारांनी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता आजच्या नवीन वर्षापासून खंबीरपणे उभे राहून कामाला सुरुवात करावी. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन शेतमालाला चांगला भाव कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे या उद्देशाने मी द्राक्षे व कांद्याची गुढी उभारून संदेश दिला आहे.
संजय साठे

Web Title: An Onion Grape Gudhi was set up by a farmer in Niphad taluka gudhi padwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.