आनंद तरंग कलापथक करणार कोरोना लसीकरण जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 09:27 PM2021-01-16T21:27:29+5:302021-01-17T00:44:20+5:30

सर्वतीर्थ टाकेद : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आनंद तरंग लोककला संचाची कोरोना लसीकरण व गोदावरी प्रदूषण नियंत्रण जनजागृती करण्यासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती आनंद तरंग कलापथकाचे प्रमुख कलाभूषण शाहीर उत्तम गायकर यांनी दिली आहे.

Anand Tarang Kalapathak will conduct corona vaccination awareness | आनंद तरंग कलापथक करणार कोरोना लसीकरण जनजागृती

आनंद तरंग कलापथक करणार कोरोना लसीकरण जनजागृती

googlenewsNext
ठळक मुद्देआठ पथकांची नियुक्ती : गोदावरी प्रदूषण नियंत्रणावरही भर

सर्वतीर्थ टाकेद : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आनंद तरंग लोककला संचाची कोरोना लसीकरण व गोदावरी प्रदूषण नियंत्रण जनजागृती करण्यासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती आनंद तरंग कलापथकाचे प्रमुख कलाभूषण शाहीर उत्तम गायकर यांनी दिली आहे.
शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी लोककला आणि पथनाट्याद्वारे करण्याचे आदेश व वेळापत्रक जिल्ह्यातील आठ पथकांना देण्यात आले आहे. १९ ते २८ जानेवारी या सात दिवसांत २८ कार्यक्रम वणी-दिंडोरी, पेठ, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, चांदवड या तालुक्यांंत कार्यक्रम १० कलावंतांच्या संचात सादर करण्यात येणार असल्याची माहिती गायकर यांनी दिली.

शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असतानाच शिर्डी येथे श्रीसाईबाबांचा शताब्दी समाधी सोहळा व श्री स्वामी समर्थ केंद्राच्या जागतिक कृषी महोत्सवात ५१ कलावंतांच्या संचात महाराष्ट्राची लोककला सादर केली. या कार्यक्रमासाठी रणजितसिंह राजपूत जिल्हा माहिती अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले असून कार्यक्रम यशस्वितेसाठी शंकरराव दाभाडे, शिवाजी गायकर, देविदास साळवे, नामदेव गणाचार्य, पंढरीनाथ भिसे, दुर्गेश गायकर, रामकृष्ण मांडे, ओमकार गायकर, सागर भोर परिश्रम घेत आहेत.


जनजागृती कार्यक्रमाबाबत शाहीर गायकर यांनी एड्स, हिवताप निर्मूलन, पल्स पोलिओ, स्त्रीभ्रूणहत्या, जलस्वराज्य प्रकल्प, सामाजिक वनीकरण, पर्यावरण संरक्षण व संतुलन, दारूबंदी, माता बाल संगोपन, गोपालन, आईबापांना वृद्धाश्रमांमध्ये पाठवू नये, यासारख्या विषयांवर समाजप्रबोधन केले असून आकाशवाणी व अनेक नामांकित कंपनीच्या कॅसेट्ससाठी गीतलेखन व सादरीकरण केले आहे .

Web Title: Anand Tarang Kalapathak will conduct corona vaccination awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.