अंबोलीला दोन गटात दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:22 AM2017-07-28T00:22:40+5:302017-07-28T00:22:59+5:30
अंबोलीला दोन गटात दंगल
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : अंबोली येथे एका युवतीशी असभ्य वर्तन करून विनयभंग केल्याच्या कारणावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून १० जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात पिडीत मुलीने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
युवतीशी असभ्य वर्तन का केले असा प्रशांत एकनाथ सोनवणे यास जाब विचारण्यासाठी आलेल्या पिडितेचा भाऊ सागर मेढे व त्याच्या समवेत आलेल्या आकाश मेढे पंकज मुळाणे आदि ९ जणांनी प्रशांत व त्याचा चुलत भाऊ राहुल धर्मा सोनवणे व मित्र नितीन रुंजा भोई व अन्य साक्षीदारास मारहाण केली़ या दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी नोंदविल्या आहेत़
गुरूवारी सायंकाळी दहा आरोपींना न्यायालयात उभे केले असतांना न्यायालयाने एका गटातील सात आरोपींना न्यायालयीन कस्टडी दिली आहे. तर दुसर्या गटातील दोन आरोपींना शनीवार पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे.