सहा एकर मक्यावर फिरविला नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 04:53 PM2019-07-09T16:53:54+5:302019-07-09T16:54:08+5:30

न्यायडोंगरी : लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने संकट

Anchor rotated on a six-acre field | सहा एकर मक्यावर फिरविला नांगर

सहा एकर मक्यावर फिरविला नांगर

Next
ठळक मुद्देपिकाची उगवण होऊन एक आठवडा पूर्ण होत नाही तोच दोन दिवसांपूर्वी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवला

न्यायडोंगरी : मका पेरून दहा दिवस होत नाही तोच अमेरिकन लष्करी अळईचा प्रादुर्भाव झाल्याने येथील एका शेतकऱ्याने सहा एकर मका पिकावर नांगर फिरविला आहे. आधीच गेल्या तीन वर्षापासून दुष्काळाशी दोन हात करणा-या शेतकऱ्यांपुढे लष्करी अळीचे नव्याने संकट उभे ठाकले आहे.
येथील शेतकरी सुनील नानासाहेब आहेर यांनी सहा एकर मकाची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पहिल्याच साधारण पावसावर केली होती. मका पेरणीनंतर ही मध्यम प्रकारचा पाऊस आल्याने १०० टक्के उगवण क्षमता पूर्ण झाली होती. पिकाची उगवण होऊन एक आठवडा पूर्ण होत नाही तोच दोन दिवसांपूर्वी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवला आणि दोन दिवसातच संपूर्ण क्षेत्रातील जवळपास ६० टक्के मक्याचे क्षेत्र लष्करी लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे पिवळे होऊन वाळून गेले. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने उद्विग्न झालेल्या सुनील आहेर यांनी संपूर्ण मक्याच्या सहा एकर क्षेत्रावर नांगर फिरविला.
मार्गदर्शनाची गरज
कृषी अधिकारी पेरणी पूर्वीच यंदा लष्करी अळईचा धोका उद्भवण्याची शक्यता बोलावून दाखवत होते. मात्र त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे याचे शेतकºयांना मार्गदर्शन झाले नाही. कृषी अधिकाºयांनी शेतकºयांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्यांना या संकटाविषयी माहिती देऊन उपाययोजना करण्यासंबंधी मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Anchor rotated on a six-acre field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक