कोटमगावी सोयाबीनवर फिरवला नांगर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 05:38 PM2018-08-02T17:38:49+5:302018-08-02T17:39:38+5:30

येवला : महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या समाधानकारक पावसाच्या अंदाजाने सर्वच शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु सदर अंदाज येवला तालुक्यात फोल ठरल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली, परिणामी तालुक्यातील कोटमगाव येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र कोटमे यांनी आपल्या शेतात उभ्या असलेल्या साडेतीन एकर सोयाबीनच्या पिकावर नांगर फिरवला आहे.

Anchor rotates on Kotamgavi soybean! | कोटमगावी सोयाबीनवर फिरवला नांगर !

कोटमगावी सोयाबीनवर फिरवला नांगर !

Next

पाऊस पडत नसल्याने विहिरांचा पाणी साठा जेमतेमच आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना कशा प्रकारे पाणी द्यावे अशी परिस्थिती येवला तालुक्यातील शेतकºयांवर ओढवली आहे. अशा परिस्थितीत लोकांची उसनवारी, उधारी करून सर्वच शेतकºयांनी यंदा बाजरी, मूग, सोयाबीन, मका, भुईमूग, कपाशी आदी पिकांची अल्प पावसावर पेरणी केली होतीे. राजेंद्र कोटमे यांनी साडेतीन एकर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीसाठी जवळपास बारा हजार रुपये खर्च करून पीक घेतले होते. पावसाळ्याचा तिसरा महिना सुरू झाला असून पावसाने ओढ दिली आहे. उन्हामुळे सोयाबीन, मकाची पिके करपण्यास सुरु वात झाली असून जनावरांचा चाºयाचा प्रश्नदेखील ऐरणीवर येत आहे.
महिनाभरापासून पाऊस आज येईल, उद्या येईल अशी आशा शेतकºयांना लागली होती. परंतु दोन महिन्याचा कालावधी उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने अजून सहा ते सात दिवसात येवला तालुक्यातील शेतकºयांच्या चिंतेत मोठी भर पडणार आहे. बेभरवशाच्या पावसामुळे शेती व्यवसायाची एक प्रकारे जुगारासारखी अवस्था झाल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Anchor rotates on Kotamgavi soybean!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक