प्राचीन गोंदेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:25 AM2021-03-13T04:25:06+5:302021-03-13T04:25:06+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत दर्शनासाठी खुली ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. तर गर्दीच्या ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत दर्शनासाठी खुली ठेवण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. तर गर्दीच्या पार्श्वभूमीवर गोंदेश्वर मंदिर महाशिवरात्रीच्या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंदिर बंद असल्याचा फलक लावण्यात आला होता व भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात आले होते. पहाटे मंदिरात पुजाऱ्याच्या हस्ते रुद्राभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी गोंदेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. शहरातील ऐश्वर्यश्वर मंदिराच्या बाहेर बॅरिकेट लावून भाविकांना आत जाण्यास बंदी करण्यात आली होती. शहरातील काही शिवालयात भाविकांनी सामाजिक अंतर पाळून दर्शन घेत पूजाअर्जा केली.
मीरगाव येथील प्रसिद्ध ईशान्येश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात सजावट करण्यात आली होती. या मंदिरातही भाविकांना दर्शनासाठी बंदी होती. दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक शिवालयात भाविकांनी मनोभावे पूजन करुन ‘ओम नम: शिवाय’ चा जयघोष करीत भोलेनाथाची मनोभावे पूजा करुन दर्शन घेतले.
फोटो - ११ गोंदेश्वर टेम्पल १
सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट.
फोटो - ११ गोंदेश्वर टेम्पल ४
सिन्नर येथील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या बाहेर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी बंद असल्याचा फलक लावण्यात आला होता.
===Photopath===
110321\11nsk_8_11032021_13.jpg~110321\11nsk_9_11032021_13.jpg
===Caption===
सिन्नर: ग्रामीण भागात ‘जय भोले’ चा गजर~फोटो - ११ गोंदेश्वर टेम्पल ४सिन्नर येथील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या बाहेर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी बंद असल्याचा फलक लावण्यात आला होता.