हजारो दिव्यांनी उजळले पुरातन गोंदेश्वर मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 12:52 AM2021-11-19T00:52:08+5:302021-11-19T00:52:44+5:30
सिन्नरचा ऐतिहासिक व धार्मिक ठेवा असलेल्या पुरातन गोंदेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या मंद उजेडात गोंदेश्वर मंदिर उजाळून निघाले होते. पणती पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारों पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या गोेंदेश्वर मंदिराची दृष्ये डोळ्याची पारणे फेडणारी ठरली.
सिन्नर : सिन्नरचा ऐतिहासिक व धार्मिक ठेवा असलेल्या पुरातन गोंदेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या मंद उजेडात गोंदेश्वर मंदिर उजाळून निघाले होते. पणती पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात हजारों पणत्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या गोेंदेश्वर मंदिराची दृष्ये डोळ्याची पारणे फेडणारी ठरली.
प्राचीन गोंदेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवारी (दि.१८) सायंकाळी सूर्यास्तानंतर गोंदेश्वर सेवा संघ व इतर सेवाभावी संघटनांनी मिळून गोंदेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा केला. याआधी काही सेवाभावी संस्थांमार्फत गोंदेश्वर मंदिरात छोटेखानी दीपदानाचा कार्यक्रम करून पणती पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात होता. तथापि, गेल्या तीन वर्षांपासून गोंदेश्वर सेवा संघाच्यावतीने भव्य अशा दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी श्री गोंदेश्वर महादेव यांची हरिहर स्वरूपात शृंगारपूजा थाटण्यात आली होती. मंदिर परिसरात एक हजारपेक्षा अधिक दीप पेटवून हर्षोल्हासात हा दीपोत्सव साजरा केला. यावेळी गोंदेश्वर सेवा संघ, युवा फाऊंडेशन, रुद्र वाद्य पथक व इतर सेवाभावी संस्थांनी परिश्रम घेतले. पर्यटनाच्या दृष्टीने व परिसराचा विकास व्हावा, या उद्देशाने गोंदेश्वर सेवा संघासह विविध सेवाभावी संस्था उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत.