देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकडीवर खंडोबाभक्तांनी ओढल्या बारागाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:18 AM2017-11-25T00:18:05+5:302017-11-25T00:19:43+5:30
देवळाली कॅम्प : यळकोट यळकोट जय मल्हार, श्री खंडेराव महाराज की जय अशा घोषणा देत व भंडाºयाची उधळण करीत खंडोबाभक्त उत्तम मांडे यांनी बारागाड्या ओढल्या. यावेळी टेकडीच्या पायथ्याशी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.
देवळाली कॅम्प येथील प्राचीन खंडेराव टेकडीवर चंपाषष्ठीनिमित्त भरणाºया यात्रेनिमित्त शुक्रवारी सकाळी पूजारी प्रकाश व नितीन आमले यांच्यासह अण्णाज ग्रुप सदस्यांच्या हस्ते महाभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी प्रशांत म्हस्के, सचिन आमले, आमले परिवार व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगूर येथील आमले परिवाराच्या निवासस्थानपासून सकाळी प्रथेप्रमाणे खंडोबा टेकडीवर पालखी मिरवणूक आणण्यात आली. त्या ठिकाणी पालखीचे पूजन व महाआरती करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
खंडोबा टेकडी येथून देवळाली कॅम्पमध्ये वाजतगाजत काठी व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. अण्णाज ग्रुपच्या वतीने भाविकांना नागेश देवाडिगा, धीरज मांडे, सुरेश शेटे, दीपक बलकवडे, दत्ता सुजगुरे आदींनी भरीत भाकरीच्या प्रसादाचे भाविकांना वाटप केले. दिवसभर भाविकांनी टेकडीवर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. टेकडीच्या पायथ्याशी प्रथेप्रमाणे सायंकाळी खंडेराव भक्त उत्तम मांडे हे टेकडीवरून धावत पायथ्याशी आले. यावेळी भाविकांनी खंडेराव महाराजांच्या नावाचा गजर करत भंडाºयाची उधळण केली.