जुन्या नाशिकमध्ये पौराणिक देखाव्यांवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:38 AM2017-08-27T00:38:08+5:302017-08-27T00:38:13+5:30

गणेशोत्सवातील देखाव्यांची तयारी जुन्या नाशिकमध्ये काही अंशी पूर्ण झाली असून, जुने नाशिकमधील बहुतांश देखावे हे पौराणिक कथांवर आधारित आहेत. अगदी श्रीकृष्ण जन्मापासून ते अष्टविनायक दर्शनापर्यंत सर्व प्रकारचे धार्मिक पर्यटन पाहावयास मिळते.

 In ancient Nashik, emphasis on mythological scenes | जुन्या नाशिकमध्ये पौराणिक देखाव्यांवर भर

जुन्या नाशिकमध्ये पौराणिक देखाव्यांवर भर

googlenewsNext

नाशिक : गणेशोत्सवातील देखाव्यांची तयारी जुन्या नाशिकमध्ये काही अंशी पूर्ण झाली असून, जुने नाशिकमधील बहुतांश देखावे हे पौराणिक कथांवर आधारित आहेत. अगदी श्रीकृष्ण जन्मापासून ते अष्टविनायक दर्शनापर्यंत सर्व प्रकारचे धार्मिक पर्यटन पाहावयास मिळते. ंबी. डी. भालेकर मैदानावर महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीच्या देखाव्यात बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन भाविकांना व्हावे, असा देखावा साकारण्यात आला आहे, तर शेजारीच असलेल्या एचएएल कामगार मित्रमंडळांच्या देखाव्यात ‘बेटी बचाओ’चा संदेश देणारा देखावा आहे. एमएसएल ड्राइव्हलाइन कंपनीने श्रीकृष्ण जन्माचा देखावा साकारला आहे. वासुदेव श्रीकृष्णाला नदीतून डोक्यावर घेऊन जाताना तसेच तुरुंगात होणारा श्रीकृष्णाचा जन्म असा देखावा आहे. येथेच नाशिक जिल्हा श्री नरहरीचा राजा सामाजिक संस्थेच्या गणेश आरासात विठ्ठल व महादेव यांचे श्री नरहरी यांना झालेला साक्षात्काराचा देखावा साकारण्यात आला आहे. श्री राजे छत्रपती सामाजिक, सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचा देशातील एकमेव १००१ किलो वजनाची तांब्याची श्री लक्ष्मी गणेशमूर्ती साकारली आहे. दंडे हनुमान चौकात श्री दंडे हनुमान मित्रमंडळाच्या देखाव्यात महंत गणेशमूर्ती साकारली आहे.आझाद चौकात आझाद मित्रमंडळाने पोटा गणेशमूर्ती उभारली आहे. १९४६ला स्थापना झालेल्या राष्टÑीय तरुण मित्रमंडळाने शेषनागावर विराजमान विष्णू-लक्ष्मी मूर्तीची आरास उभारली आहे.
साक्षी गणेश मित्रमंडळाने आकर्षक सभामंडपाचा देखावा साकारला आहे. भारत मित्रमंडळाने अष्टविनाायक दर्शनाची भाविकांना मेजवानी दिली आहे. भद्रकाली युवक मंडळाने सीता हरणाचे चलतचित्र साकरले आहे. भद्रकाली आॅटोरिक्षा युनियने विठ्ठलाचे आकर्षक रूप उभारले आहे. नटराज मित्रमंडळाचा भद्रकालीचा राजा यंदाही आकर्षण ठरेल. पिंपळचौक येथे श्रीसेवा कला व क्रीडा मंडळाची १३ फूट हनुमानाची मूर्ती आकर्षक आहे.
९३ वर्षांची परंपरा
जनसेवा मित्रमंडळाने आकर्षक गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. १९२५ची स्थापना असलेल्या ९३ वर्षांच्या सोमवार पेठेतील गुलालवाडी व्यायामशाळा मित्रमंडळाने उज्जैन येथील कालभैरव मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. ४३वे वर्ष असलेल्या वेलकम मित्रमंडळाने मदनलाल धिंग्रा यांनी इंग्लडमध्ये कर्नल व्हॅलीचा केलेल्या वधाचे चलतचित्र देखावा उभारला आहे. हिंदमाता मित्रमंडळाने महाकाली देवीचे रौद्रावतारासमोर शंकर पायाशी असलेला देखावा उभा केला आहे.

Web Title:  In ancient Nashik, emphasis on mythological scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.