...अन् नववधू झाली गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:52 AM2018-06-10T00:52:28+5:302018-06-10T00:52:28+5:30
नांदगाव : हुंडा घेऊन चांगले लग्न लावून देण्याची बोली करण्याचे दिवस इतिहासजमा होत चालले आहेत. याउलट वयाने वाढत असलेल्या मुलासाठी हवी तेवढी रक्कम देतो; पण नवरी मिळवून दे अशी याचना करण्याची वेळ कुटुंबप्रमुखांवर आली आहे. या परीस्थितीचा गैरफायदा घेणारे महाभागही समाजात उत्पन्न झाले आहेत. आगतिक नवरा, कुणा अनोळखी मुलीबरोबर लग्न करण्यासाठी मजबूर होतो आणि ‘ती लाडाची नवराई’ काही दिवसातच पूर्व नियोजित कटानुसार पळून जाते. याचे प्रत्यंतर देणारी घटना नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे घडली. अशा प्रकारे काम करणारी ही एक टोळी असावी असा पोलिसांचा कयास आहे.

पोखरीचे शेतकरी बाबुराव देवरे त्यांचा मुलगा भगवान याचे साठी पाच वर्षांपासून वधूच्या शोधात होते. पण मुलगी मिळत नव्हती. याच गावातला सोमनाथ भुरक (४५) याने जालना, परभणीकडची मुलगी सुचवीली. मनमाड रेल्वे स्टेशनला दि. ८ एप्रिल २०१८ रोजी मुलगी बघण्याचा कार्यक्र म झाला. अश्विनी या मुलीबरोबर अनिल, मुलीची मावशी व छाया नामे बहीण आले होते. मुलगी पसंत नाही पडली तर मनमाड येथूनच दोन्ही पार्ट्या परत जातील असे ठरले होते.
पसंती झाली तर मोठी घसघशीत रक्कम मध्यस्थांना द्यावयाचा सौदा झाला होता. पसंती झाली. लगेच विवाह सोहळा आटोपून टाकू म्हणून संध्याकाळी वºहा पोखरीला पोहोचले. दुसऱ्या दिवशी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. अश्विनीच्या अंगावर सोनेचांदीचे ६००० रु. किमतीचे दागिने बाबुराव यांनी घातले. त्यानंतर अनिलकाका व मावशीबाई यांना ठरल्याप्रमाणे १,२०,००० रु देण्यात आले. मध्यस्थी सोमनाथ भूरक, बळीराम चव्हाण, बाबुराव देवरे, भाऊसाहेब गागरे यांच्या साक्षीने रक्कम देण्यात आली.
दोन दिवसांनी मुलीचा मेव्हणा संजय मोरे नव्या कोºया दुचाकीवरून तिला घेऊन जाण्यासाठी आला. त्याचे यथोचित आदरातिथ्य करून मुलीला त्याच्या बरोबर माहेरी पाठविण्यात आले. जातांना दोन दिवसांनी तिला घेऊन
जा असे सांगुन दोघे गेले. औरंगाबादचा पत्ता दिला. आंबेडकर नगर, गल्ली न.४, मुकुंदवाडी. इथपर्यंत सर्व काही सुरळीत होते. ठरल्याप्रमाणे अश्विनीला आणण्यासाठी मुलाचे वडील गेले. पण पत्ता चुकीचा निघाला. गल्ली न. ४ त्या भागात नाहीच. दिलेल्या मोबाईल नंबरवर वारंवार फोन करूनही केवळ आश्वासनेच मिळाली. उलट अनिल काकाने बदल्यात दुसरीच मुलगी आणून देतो असे सांगितले. अश्विनी आता तर फोन घेतच नाही. चुकून लागला तर ती मी इंदोरला असल्याचे सांगते. गावातील भगीरथ जेजुरकर व मनमाडचे स्नेही अमोल कुलकर्णी, शैलेस पठाडे यांनी गोड बोलून दुसरा मुलगा आहे अशी बतावणी केली आणि मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर आलेल्या सुनीता पाटोळे व तिच्या बरोबर असलेल्या महिलेस पकडून आधी मनमाड पोलीस स्टेशनमध्ये व त्यानंतर नांदगाव पोलिस स्टेशनला आणण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.