और भाई, क्या हाल चाल है..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:15 AM2019-04-23T01:15:28+5:302019-04-23T01:16:10+5:30
पंपळगावी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. ओझरहून तीन हेलिकॉप्टरच्या ताफ्यात मोदींचे आगमन झाले. हेलकॉप्टरने लँडिंग केल्यावर त्यांनी काही फुटांवर असलेल्या आपल्या वाहनाकडे न जाता काही वेळ तिथेच उपस्थितांमध्ये घालवला. त्या चार मिनिटात त्यांनी उपस्थितांना विविध प्रश्न विचारत जणू तोंडी परीक्षाच घेतली.
ओझर : पंपळगावी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. ओझरहून तीन हेलिकॉप्टरच्या ताफ्यात मोदींचे आगमन झाले. हेलकॉप्टरने लँडिंग केल्यावर त्यांनी काही फुटांवर असलेल्या आपल्या वाहनाकडे न जाता काही वेळ तिथेच उपस्थितांमध्ये घालवला. त्या चार मिनिटात त्यांनी उपस्थितांना विविध प्रश्न विचारत जणू तोंडी परीक्षाच घेतली.
मोदींनी पहिल्यांदा और भाई, क्या हालचाल है, असा सवाल करत येथे द्राक्षांची यंदा चांगली उलाढाल झाली आहे. येथील उसाचा टक्का काय आहे. कांदा अनुदान संबंधी, पाण्याच्या नियोजनाबद्दल त्यांनी स्वत:हून विचारले तेव्हा येथे नार- पारचाच विषय सध्या गाजतोय आहे असे सांगितल्यावर त्यावर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी नार पारचे पाणी महाराष्ट्रालाच मिळणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या उत्तरावर सगळेच अवाक झाले. शेतकरी कसा समृद्धीकडे जाईल यावर क्र ांतिकारी निर्णय होईल तसेच शेतमाल,गुणवत्ता आणि त्याचा दर हे शेतकरी समृद्धीचे द्योतक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर हा भविष्यातील सर्वात महत्वाचा भाग असणार आहे असे देखील त्यांनी सांगितले.
शेतीचा, पाण्याचा विषय पूर्ण झाल्यानंतर उद्योगासंबंधीही त्यांनी स्वत:हून माहिती विचारली. त्यावर एच ए एलचा कारखाना येथून जवळच असून तेथील कामगारांना भविष्याची चिंता भेडसावत असल्याचे एकाने सांगितल्यावर त्यावर पंतप्रधानांनी ठीक आहे सांगितले आणि पुढे हाच मुद्दा त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केला. सामान्यलोकांना जेव्हा पंतप्रधान थेट प्रश्न विचारतात त्यावेळचा अनुभव किती रोमांचकारी असतो हेच त्या चार मिनिटात स्पष्ट झाले.