...अन् आमदार बस घेऊनच गावात पोहोचले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:59 PM2020-01-20T23:59:05+5:302020-01-21T00:12:14+5:30

बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम पश्चिम पट्ट्यातील करंजखेड गावात अद्याप एसटी पोहोचली नव्हती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना पदयात्रेशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. गावकºयांचा हा कष्टमय प्रवास थांबावा यासाठी गावकºयांनी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे कैफीयत मांडली आणि सोमवारी (दि.२०) स्वत: आमदार एसटी बस घेऊनच गावात पोहोचले. त्यावेळी करंजेड ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

... and the MLA reached the village by bus! | ...अन् आमदार बस घेऊनच गावात पोहोचले!

सटाणा -करंजखेड बससेवेच्या शुभारंभप्रसंगी आमदार दिलीप बोरसे, आगार व्यवस्थापक उमेश बिरारी, सोमनाथ सूर्यवंशी, तुकाराम देशमुख, सरपंच संजय चौरे, शरद शेवाळे आदींसह उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थी.

Next
ठळक मुद्देकरंजखेडला आनंदोत्सव : गावकऱ्यांनी गावात पहिल्यांदाच पाहिली एसटी

सटाणा : प्रगत म्हणवल्या जाणाºया महाराष्टÑात बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम पश्चिम पट्ट्यातील करंजखेड गावात अद्याप एसटी पोहोचली नव्हती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना पदयात्रेशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. गावकºयांचा हा कष्टमय प्रवास थांबावा यासाठी गावकºयांनी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्याकडे कैफीयत मांडली आणि सोमवारी (दि.२०) स्वत: आमदार एसटी बस घेऊनच गावात पोहोचले. त्यावेळी करंजेड ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी बोरसे यांनी परिसरातील ८० हून अधिक विद्यार्थ्यांना बस मध्ये बसवत त्यांना थेट डांगसौंदाणे येथील विद्यालयातही सोडले.
करंजखेड परिसरातील दीडशेहून अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी दररोज पंधरा किलोमीटर पायपीट करून डांगसौंदाणे येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये जात असल्याने या परिसरात बस सेवा सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार बोरसे यांच्याकडे केली होती. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी सटाणा बस आगाराचे आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांची भेट घेत बससेवा सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. आगार व्यवस्थापक बिरारी यांनी २० जानेवारीपासून बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. आश्वासनानुसार आमदार दिलीप बोरसे सोमवारी सकाळी आठ वाजताच सटाणा बस आगारात दाखल झाले. आगार व्यवस्थापक बिरारी यांनी ठरल्याप्रमाणे सटाणा करंजखेड बसचे नियोजन केल्याने सकाळी साडेनऊ वाजता आमदार दिलीप बोरसे हे आगार व्यवस्थापकासह बसमध्ये बसत करंजखेडच्या दिशेने मार्गस्थ झाले. करंजखेड येथे पहिल्यांदाच बस दाखल झाल्याने गावकºयांनी चालक-वाहकाचे जंगी स्वागत केले. विशेष म्हणजे स्थानिक आदिवासी बांधवांनी बस देखील सजवून टाकली.
गोरगरीब आदिवासी बांधवांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा असल्यातरी आजच्या आधुनिक युगात प्रवासाची साधनेदेखील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एकविसाव्या शतकातही विद्यार्थ्यांना
१५ किलोमीटर पायी प्रवास करून शिक्षणासाठी जावे लागत असेल तर ते नक्कीच दुर्दैवी आहे. अशा गंभीर समस्या सोडवणे हेच लोकप्रतिनिधींचे काम असते. - दिलीप बोरसे, आमदार

Web Title: ... and the MLA reached the village by bus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.