...अन् रानशिवारात घंटीचा आवाज घुमला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 04:20 PM2019-07-20T16:20:13+5:302019-07-20T16:20:38+5:30

बैलजोडीच्या साहाय्याने मशागत : कोळपणीला सुरुवात

... and the noise of the bell rang! | ...अन् रानशिवारात घंटीचा आवाज घुमला!

...अन् रानशिवारात घंटीचा आवाज घुमला!

googlenewsNext
ठळक मुद्देपाऊस समाधान कारक असल्याने बैल जोडीच्या मशागतीसाठी मोठी मागणी आहे.

मानोरी : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील मानोरी बुद्रुक, देशमाने, खडकीमाळ , मुखेड, जळगाव नेऊर, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी, जऊळके आदी परिसरात समाधानकारक पडलेल्या पावसामुळे मका, सोयाबीनच्या पिकांची निंदणी, कोळपणीची कामे सुरू झाल्याने बैलांच्या गळ्यात बांधलेल्या घंटीचा आवाज रानशिवारात घुमू लागला आहे.
गत वर्षी दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांना मका कोळपणी करण्याची वेळच आली नव्हती तर अनेक मजूर वर्गाला काम देखील मिळत नव्हते. यंदा पाऊस समाधानकारक असला तरी लष्करीअळीने मात्र शेतकरी त्रस्त झालेला आहे. मका, सोयाबीन निंदणी , कोळपणी सध्या सुरू असून बैलजोडीच्या सहाय्याने कोळपणी करण्यासाठी शेतकरी पसंती देत आहेत. ट्रॅक्टर च्या सहायाने कमी दिवसात, कमी खर्चात पैशाची बचत करून शेती व्यवसाय केला जात असला तरी मजुरांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली. मात्र, आजही बव्हंशी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य देत आहेत. त्याचमुळे बैलांच्या गळ्यातील घंटीचा आवाज रानशिवारात पुन्हा घुमू लागला आहे. पाऊस समाधान कारक असल्याने बैल जोडीच्या मशागतीसाठी मोठी मागणी आहे. बैल जोडीच्या सहायाने अनेक शेतकरी मका कोळपुन घेत आहेत.

Web Title: ... and the noise of the bell rang!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.