...अन् शहरात रात्री चालला ‘खाकी’चा दंडासह दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 01:30 AM2021-03-29T01:30:06+5:302021-03-29T01:30:35+5:30
शहर व परिसरात अत्यावश्यक सेवेतील मेडिकल वगळता अन्य सर्व अस्थापना रात्री आठ वाजताच बंद करण्याचे आदेश शासनाने रविवारी (दि.२८) जारी केले. या आदेशाची शहरात पोलिसांकडूत तात्काळ अंमलबजावणी सुरु झाली. ज्या अस्थापनांकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात येताच त्या अस्थापनांवर दंडात्मक कारवाई मनपाच्या पथकाला सोबत घेत करण्यात आली. मास्कविना वावरणाऱ्या नागरिकांना दंडुक्याचा ‘प्रसाद’ही देण्यात आला.
नाशिक : शहर व परिसरात अत्यावश्यक सेवेतील मेडिकल वगळता अन्य सर्व अस्थापना रात्री आठ वाजताच बंद करण्याचे आदेश शासनाने रविवारी (दि.२८) जारी केले. या आदेशाची शहरात पोलिसांकडूत तात्काळ अंमलबजावणी सुरु झाली. ज्या अस्थापनांकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे लक्षात येताच त्या अस्थापनांवर दंडात्मक कारवाई मनपाच्या पथकाला सोबत घेत करण्यात आली. मास्कविना वावरणाऱ्या नागरिकांना दंडुक्याचा ‘प्रसाद’ही देण्यात आला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने रविवारी नवे आदेश जारी केले आहेत. केवळ वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने रात्री आठ वाजेला बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी शहर पोलिसांनी तातडीने सुरु केली. नाशिकरोड, उपनगर, सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन व्यावसायिकांना ध्वनिक्षेपकांद्वारे सूचना दिली. तसेच सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन व्यावसायिकांना ध्वनिक्षेपकांद्वारे सूचना दिली. तसेच विविध व्यावसायिकांना योग्य अंतरावर ग्राहकांना उभे राहण्याच्या सूचनांची सक्तीने अंमलबजावणी करण्यावर भर दिला गेला. सरकारवाडा पोलिसांनी मेहेर सिग्नलवरील हॉटेल मेहेर या अस्थापनेला नियमांचे भंग केल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे नाशिकरोड पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी तिघांना प्रत्येकी ३ हजार तर मास्क न लावल्याप्रकरणी १७ बेफिकिर लोकांना एकुण साडेतीन हजारांचा दंड करण्यात आला.
व्यावसायिकांची उडाली धावपळ
राज्य शासनाच्या नव्या आदेशाप्रमाणे केवळ मेडिकल वगळता अन्य सर्व दुकाने रात्री आठ वाजता बंद करण्यासाठी शहर पोलीस रविवारी रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिसांनी ‘खाकी’च्या शैलीत व्यावसायिकांना इशारा देत कारवाई सुरु केल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. यावेळी विना मास्क दुचाकींवरुन फिरणारे तसेच पादचाऱ्यांनाही पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळाला. यामुळे शहरातील सर्वच भागात चोखपणे अंमलबजावणी झाल्याचे चित्र दिसून आले.
पंचवटीत तीन बीअर बारवर कारवाई
पंचवटी परिसराती तीन बीअर बार चालकांवर कारवाई करत पुढील आदेशापर्यंत ‘सील’ करण्यात आले. पोलिसांची धडक कारवाई शहरात एकाचवेळी सुरु झाल्याने नाशिकरोड भागासह मध्यवर्ती भागातील मेनरोड, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, पंचवटी कारंजा, गंगापुररोड, शरणपुररोड, भद्रकाली, जुने नाशिक या भागातील केवळ मेडिकल वगळता अन्य सर्व दुकानांची शटर डाऊन होण्यास सुरुवात झाली होती.