अन् पोलिसांनी ठोकल्या ‘त्यांना’ लग्नाच्या बेड्या
By admin | Published: May 22, 2017 02:10 AM2017-05-22T02:10:29+5:302017-05-22T02:10:54+5:30
सटाणा : आठ दहा वर्षांपूर्वी ते दोन्ही प्रेमात पडले.दोन्ही सरकारी नोकरीला लागल्याने दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : आठ दहा वर्षांपूर्वी ते दोन्ही प्रेमात पडले. कालांतराने ती जिल्हा परिषद शिक्षिका झाली आणि तो महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस.दोन्ही सरकारी नोकरीला लागल्याने दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.मात्र प्रियकर व प्रेयसी भिन्न समाजाचे असल्याने दोन्ही कुटुंबांकडून कडाडून विरोध झाला. दरम्यान दोघांसमोर आभाळाएवढ संकट आलं. प्रेयसीला कर्करोग झाल्याचं त्याला समजलं. ती या आजारातून बरी व्हावी म्हणून अखेरपर्यंत तो लढत राहिला.अखेर डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे तिचा आजार बरा झाला. आणि पोलिसांनीच या दोघाच्या लग्नाच्या गाठी जुळवून आणल्या.
विनवणी करूनही जातीपातीच्या बंधनात बुडालेल्या सागरच्या कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्याने पोलीस कर्मचार्यांचे कुटुंब त्याचे कुटुंब मानून २१ मे रोजी थाटात लग्न करण्याचा निर्णय सागरने घेतला. पोलीस वसाहतीत सागरच्या लग्नाची तयारी सुरु झाली. शनिवारी पार पडलेल्या सागरच्या मांडवात सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचार्यांच्या कुटुंबीयांनी त्याला हळद लावली.
नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथे मोठ्या थाटात पार पडलेल्या या आंतरजातीय विवाहाला सागरचे कोणतेही नातेवाईक उपस्थित नव्हते. मात्र सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बशीर शेख,सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर,उपनिरीक्षक कृष्णा घायवट, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी कुटुंबियांसह उपस्थित होते