...अन देखावे खुले झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:18 AM2017-08-29T01:18:59+5:302017-08-29T01:19:04+5:30
ध्वनिमर्यादा, मंडपाचा आकार, गणेशमूर्ती व भाविकांची सुरक्षा आदीबाबत विविध नियमावलींचे पालन करण्यासाठी सातत्याने पोलीस प्रशासनाकडून दबाव वाढविला जात होता; यामुळे भालेकर मैदानावरील सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (दि.२८) घेतला. सदर बाब पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनी मैदानावर दाखल होऊन सर्व मंडळांच्या पदाधिकाºयांशी चर्चा करत आश्वासने दिली. यानंतर रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास मंडळांनी देखावे खुले केले.
नाशिक : ध्वनिमर्यादा, मंडपाचा आकार, गणेशमूर्ती व भाविकांची सुरक्षा आदीबाबत विविध नियमावलींचे पालन करण्यासाठी सातत्याने पोलीस प्रशासनाकडून दबाव वाढविला जात होता; यामुळे भालेकर मैदानावरील सार्वजनिक गणेश मंडळांनी देखावे बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (दि.२८) घेतला. सदर बाब पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांनी मैदानावर दाखल होऊन सर्व मंडळांच्या पदाधिकाºयांशी चर्चा करत आश्वासने दिली. यानंतर रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास मंडळांनी देखावे खुले केले. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील भालेकर मैदानावर विविध खासगी कंपन्यांच्या कर्मचाºयांचे सार्वजनिक गणेश उत्सव समितीकडून देखाव्यांचे सादरीकरण केले जाते. यावर्षीदेखील आठ ते दहा मंडळांनी या मैदानावर विविध विषयांनुसार देखाव्यांचे सादरीकरण केले आहे. यंदा मात्र पोलीस प्रशासनाकडून मंडपाच्या उभारणीपासूनच ससेमिरा सुरू केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. सातत्याने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाºयांकडून मंडळांना सूचना प्राथमिक स्वरूपात तोंडी दिल्या जात होत्या. त्यानंतर लेखी स्वरूपात नोटिसा बजावण्यात आल्यामुळे मंडळांचे पदाधिकारी संतप्त झाले. सर्व मंडळांनी एकत्र येत बैठक घेऊन सोमवारी रात्री देखावे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी देखावे सुरू झाले नाही. पावसाने काही वेळ उघडीप दिल्यामुळे भाविकांची देखावे बघण्यासाठी गर्दी झाली होती; मात्र मैदानावर अंधाराचे साम्राज्य पसरल्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला. सदर वार्ता कर्णोपकर्णी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमांद्वारे दस्तूरखुद्द पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यापर्यंत जाऊन पोहचली. यानंतर त्यांनी भाविकांच्या भावना व गणेशोत्सवाचा आनंद लक्षात घेत तातडीने वरिष्ठ अधिकाºयांना मैदानावर जाण्याचे आदेश दिले.
पोलीस ‘बॅकफूट’वर...
ध्वनिमर्यादा, मंडपांचा आकार आदींबाबत लेखी नोटिसा बजावल्यामुळे मंडळांच्या पदाधिकाºयांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ देखावे संध्याकाळनंतर सुरू झाले नाही. यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर पोलिसांनी या ठिकाणी येऊन पदाधिकाºयांची समजूत काढली. कुठल्याही प्रकारच्या कारवाईला मंडळाला सामोरे जाणार नाही, हेतुपुरस्सर सूचना देऊन विनाकारण त्रास देण्याचा पोलिसांचा हेतू नाही, हे पटवून देत पोलीस ‘बॅकफूट’वर आले. त्यानंतर रात्री उशिरा पावणे नऊ वाजता मंडळांनी देखावे सुरू केले.