..अन् शेतकºयाच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 11:05 PM2020-01-09T23:05:24+5:302020-01-09T23:05:55+5:30

एकीकडे शेतकऱ्यांना गंडविण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच प्रामाणिकपणे सापडलेले किंवा बँकेत भरण्यात जास्त आलेले पैसे परत देऊन सत्याच्या मार्गावर चालणाºया व्यक्तींचा आदर्शही पहावयास मिळत आहे. असाच काहीसा प्रकार पाटोदा येथे घडला असून, बँक कर्मचाºयाने भरण्यात जास्तीचे आलेले पन्नास हजार रुपये संबंधित शेतकºयास प्रामाणिकपणे परत देताच शेतकºयाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अन् उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही आपसूकच पाणावल्या. पाटोदा येथील बँक आॅफ बडोदाचे कर्मचारी मुख्य रोखपाल उत्तम पंडित यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

..And the tears flowing in the eyes of the farmer | ..अन् शेतकºयाच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

पाटोदा येथील बँक आॅफ बडोदा शाखेत भरण्यात जास्तीचे आलेले पन्नास हजार रु पये शेतकरी लक्ष्मण सोनवणे यांना परत करताना भूषण राणे, उत्तम पंडित, आदित्य जगताप आदी.

Next
ठळक मुद्देपाटोदा : बॅँक कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; जास्तीचे आलेले पन्नास हजार रुपये केले परत

पाटोदा : एकीकडे शेतकऱ्यांना गंडविण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच प्रामाणिकपणे सापडलेले किंवा बँकेत भरण्यात जास्त आलेले पैसे परत देऊन सत्याच्या मार्गावर चालणाºया व्यक्तींचा आदर्शही पहावयास मिळत आहे. असाच काहीसा प्रकार पाटोदा येथे घडला असून, बँक कर्मचाºयाने भरण्यात जास्तीचे आलेले पन्नास हजार रुपये संबंधित शेतकºयास प्रामाणिकपणे परत देताच शेतकºयाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अन् उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडाही आपसूकच पाणावल्या. पाटोदा येथील बँक आॅफ बडोदाचे कर्मचारी मुख्य रोखपाल उत्तम पंडित यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कातरणी येथील शेतकरी लक्ष्मण पोपट सोनवणे आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत गेले होते. सोनवणे यांनी बँकेत सुमारे तीन लाख रुपयांचा भरणा केला; मात्र भरणा केल्यानंतर पंडित यांना त्यात तफावत आढळून आली. वारंवार नोटा मोजूनही त्या जास्त भरत होत्या.
सुमारे पन्नास हजार रुपये भरण्यात जास्त आल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब बँकेचे शाखाधिकारी भूषण राणे यांना सांगून सदर शेतकºयास बँकेत बोलावून घेतले. रकमेबाबत खात्री पटल्यानंतर ती रक्कम शेतकºयाला परत दिली. यावेळी आपली रक्कम परत मिळाल्याने शेतकºयालाही आनंद झाला.
पंडित यांच्या प्रामाणिकतेबद्दल शाखाधिकारी राणे, दिनेश
पाचोडे, आदित्य जगताप, शशांक पेरकर, सुरेश देव्हाडराव, सोपान काळे, प्रदीप गुजराथी, योगेश
खरोटे, दुलेमिया मुलाणी, अश्पाक मुलाणी, संतोष आहेर, सतीश पाटील, मोहन कुंभारकर, गोरख घुसळे, जाकीर शेख, प्रकाश पंडित, भगवान साताळकर आदींनी सत्कार केला.

शेतकºयाचे पैसे जास्त आल्याचे लक्षात आल्यानंतर मी त्या शेतकºयाच्या शेजारी उभ्या असलेल्या शेतकºयास याबाबत कल्पना दिली व संबंधित शेतकºयास जास्त आलेली रक्कम परत केली. त्यामुळे मनाला समाधान मिळाले.
- उत्तम पंडित,
रोखपाल, बँक आॅफ बडोदा

बँकेच्या व्यवहारामध्ये प्रत्येक ग्राहकाने आपली प्रामाणिकता दाखविणे गरजेचे आहे. बँकेतील प्रत्येक कर्मचारी हा प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असल्याचा अभिमान आहे. नागरिकांनीही आपल्या रकमेची काळजी घ्यावी.
- भूषण राणे, शाखाधिकारी,
बँक आॅफ बडोदा, पाटोदा

Web Title: ..And the tears flowing in the eyes of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.