अन् गजांचा अडसर झाला दूर

By admin | Published: November 5, 2016 02:31 AM2016-11-05T02:31:21+5:302016-11-05T02:44:45+5:30

नाशिकरोड कारागृह : गळाभेटीचा अनोखा उपक्रम

And the yard is blocked | अन् गजांचा अडसर झाला दूर

अन् गजांचा अडसर झाला दूर

Next

नाशिकरोड : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात प्रशासनाकडून शुक्रवारी बंदी बांधव व त्यांच्या पाल्यांसाठी गळाभेट हा अनोखा उपक्रम राबविल्याने सर्वांचेच डोळे पाणावले होते. राज्याचे कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेनुसार कारागृहातील बंदी बांधवांची सोळा वर्षाआतील मुले व मुली यांच्याकरिता गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाकडून करण्यात आले होते. हा उपक्रम राबविण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी बंदी बांधवांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जवळपास १७० पाल्यांनी अर्ज दाखल केले होते. मध्यवर्ती कारागृहातील एका सभागृहात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बंदी बांधव व त्यांच्या मुलांच्या गळाभेटीचा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. कारागृहात तयार करण्यात आलेले फराळाचे पदार्थ बंद्यांनी आपल्या पाल्यांना वाटप केले. कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, यांनी या उपक्रमाची माहिती देताना पुण्याच्या येरवडा कारागृहापाठोपाठ नाशिकरोड कारागृहाने सदर उपक्रम राबविल्याचे सांगितले. यावेळी उपअधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ अधिकारी मानकर, लटपटे आदिंसह अधिकारी, कर्मचारी, बंद्यांचे नातेवाईक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: And the yard is blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.