आॅनर किलिंग : आंतरजातीय विवाहाचा राग धरून मुलीचा आवळला होता गळा

By admin | Published: June 20, 2017 12:19 AM2017-06-20T00:19:29+5:302017-06-20T00:19:57+5:30

गर्भवती लेकीच्या हत्येप्रकरणी बापाला फाशीची शिक्षा

Andrar Killing: The girl's appetite was filled with anger of an inter-caste marriage | आॅनर किलिंग : आंतरजातीय विवाहाचा राग धरून मुलीचा आवळला होता गळा

आॅनर किलिंग : आंतरजातीय विवाहाचा राग धरून मुलीचा आवळला होता गळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : आंतरजातीय विवाह केल्याचा राग वर्षभर मनात धरून नऊ महिन्यांच्या गर्भवती लेकीची हत्या करणाऱ्या जन्मदात्यास सोमवारी (दि.१९) जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आरोपी एकनाथ किसन कुंभारकर (४४) यास फाशीची शिक्षा सुनावली आहे. रिक्षामध्ये पोटच्या मुलीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना २८ जून २०१३ रोजी शहरात घडली होती. या घटनेने नाशिक नव्हे तर संपूर्ण राज्य हादरले होते. कामगारनगरमधील काशीनाथ कांबळे यांच्या कु टुंबातील दीपक कांबळे (२३) या तरुणाशी एकनाथ कुंभारकर यांची मुलगी प्रमिलाचे प्रेमसंबंध जुळले होते. वणीच्या गडावर जाऊन २०१२ साली त्यांनी विवाह केला होता. आंतरजातीय विवाह केल्यामुळे प्रमिलाविषयी राग मात्र पित्याच्या मनात कायम होता. सहा ते सात महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर कुंभारकर याने मुलीच्या घरी येणे-जाणे सुरू केले. जावयासह सासरच्या लोकांचा विश्वास संपादन केला. प्रमिला नऊ महिन्यांची गर्भवती असताना (पान २ वर) प्रसूतीच्या काही दिवसांपूर्वीच त्याने पहाटे तिच्या सासरी जाऊन ‘आजीची प्रकृती बिघडली आहे, असे खोटे सांगून प्रमिलाला सोबत घेऊन एकनाथ कुंभारकर निघाला व रिक्षामधून (एमएच १५, जे २५९५) निर्जन ठिकाणी फिरविले. सावरकरनगरमध्ये एका खासगी रुग्णालयासमोर रिक्षा थांबविली आणि रिक्षाचालकाला रुग्णालयातून मामाला बोलवावयास सांगितले. रिक्षाचालक रुग्णालयाच्या दिशेने गेल्यानंतर कुंभारकर याने स्वत:कडे असलेल्या परकराची नाडी काढून शेजारी बसलेल्या प्रमिलाचा गळा आवळला. रिक्षाचालक जवळ आला असता त्याने सदर प्रकार बघितला. यावेळी प्रमिलाच्या तोंडातून फेस येत होता. कुंभारकर याने त्वरित रिक्षातून पलायन केले. रिक्षाचालकाने अत्यवस्थ अवस्थेत प्रमिलाला खासगी रुग्णालयात नेले; मात्र रुग्णालयाने ‘पोलीस केस’ सांगून शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्याने प्रमिलाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. ‘आॅनर किलिंग’ प्रकरण असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या जन्मदात्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी तेव्हापासून आजतागायत लेकीच्या आईने लावून धरली होती. न्यायालयाने या खटल्यात एकूण दहा साक्षीदार तपासले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील डॉक्टर, प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालक, मुलीची आई, सासू यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुमारे चार वर्षांनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी कुंभारकर यास फाशीची शिक्षा सुनावली. —— कोट... ‘आॅनरकिलिंग’प्रकरणी पहिलाच निकाल सदर गुन्ह्णाचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. याप्रकरणी न्यायालयाने दहा साक्षीदार तपासले. हत्येप्रकरणी फाशी, पूर्ण वाढ झालेल्या गर्भाशयातील भू्रणच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दहा वर्षे सक्त मजूरी व पाच हजारांचा दंड आणि खुनाच्या उद्देशाने अपहरणप्रकरणी आजन्म कारावास अशा अनुक्रमे भादंवि ३०२/३१६/३६४ कलमान्वये न्यायालयाने आरोपी एकनाथ कुंभारकर यास दोषी ठरवित शिक्षा सुनावली. आॅनरकिलिंगप्रकरणी शहरात जिल्हा न्यायालयाने दिलेला हा पहिलाच निकाल आहे. या खटल्यात डॉक्टर, रिक्षावाला, मयत मुलीची सासू यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, पोलीस नाईक सुधाक र गायकवाड यांनीही या गुन्ह्णात न्यायालयाला वेळोवेळी महत्त्वाचे पुरावे सादर केले. -अ‍ॅड. पौर्णिमा नाईक, सरकारी वकील —-इन्फो—- जातपंचायतविरोधी झाला कायदा शहरातून प्रमिलाच्या हत्येच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोर्चा काढला होता. त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ८ आॅगस्ट २०१३ रोजी नाशिकला परिषद घेतली होती. प्रमिलाचा बळी व्यर्थ जाणार नाही आणि राज्यातील अशा हजारो-लाखो कुटुंबांना न्याय मिळवून देत जातपंचायतीचे राज्यातून समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार यावेळी दाभोलकर यांच्यासमवेत कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर आठवडाभराने लातूरमध्येही त्यांनी परिषद घेतली होती. दुर्दैवाने २० आॅगस्ट २०१३ रोजी दाभोलकरांचीच हत्त्या झाली. त्यानंतर ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी त्यांचा हा लढा पुढे चालू ठेवला. १३ एप्रिल २०१६रोजी राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केल्याने या लढ्याला यश आले. असा कायदा करणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात एकमेव ठरले आहे. एकूणच प्रमिलाच्या हत्त्येनंतर राज्यातील जातपंचायतसारखी हीन प्रवृत्ती चव्हाट्यावर आली आणि या गैरप्रवृत्तीविरोधात आवाज राज्यात बुलंद झाला. ———इन्फो घटनास्थळावरील मातीचा राज्यभर प्रवास सावरकरनगर परिसरात ज्या ठिकाणी प्रमिलाची हत्त्या करण्यात आली. त्या घटनास्थळावरील मातीचा राज्यभर प्रवास झाला होता. ‘अंनिस’च्या वतीने महत्त्वाच्या पाच जिल्ह्णांमध्ये घेण्यात आलेल्या परिषदांमध्ये ‘समतेचे रोपटे’ आणून त्यामध्ये या घटनास्थळावरील माती टाकून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते. एकूणच जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे प्रमिलाला न्याय मिळाला आहे. फोटो आर वर १९एकनाथ नावाने : कॅप्शन - आरोपी एकनाथ कुंभारकर यास न्यायालयातून घेऊन जाताना पोलीस. घटनास्थळावरील मातीचा राज्यभर प्रवास सावरकरनगर परिसरात ज्या ठिकाणी प्रमिलाची हत्त्या करण्यात आली, त्या घटनास्थळावरील मातीचा राज्यभर प्रवास झाला होता. ‘अंनिस’च्या वतीने महत्त्वाच्या पाच जिल्ह्यांमध्ये घेण्यात आलेल्या परिषदांमध्ये ‘समतेचे रोपटे’ आणून त्यामध्ये या घटनास्थळावरील माती टाकून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते. एकूणच जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे प्रमिलाला न्याय मिळाला आहे.

Web Title: Andrar Killing: The girl's appetite was filled with anger of an inter-caste marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.