टास्क फोर्सच्या मान्यतेनंतर अंगणवाड्या होणार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 01:38 AM2022-02-09T01:38:59+5:302022-02-09T01:39:21+5:30

कोरोनाची परिस्थिती हळहळू पूर्वपदावर येत असून शाळा व महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत. त्यानुसार टास्क फोर्सने मान्यता दिल्यास अंगणवाडी उघडण्यास जिल्हा स्तरावर आवश्यक सर्व तयारीचे नियोजन करावे, अशा सूचना महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Anganwadas will be started after the approval of the task force | टास्क फोर्सच्या मान्यतेनंतर अंगणवाड्या होणार सुरू

टास्क फोर्सच्या मान्यतेनंतर अंगणवाड्या होणार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देप्रधान सचिवांकडून आढावा : नियोजन करण्याच्या सूचना

नाशिक : कोरोनाची परिस्थिती हळहळू पूर्वपदावर येत असून शाळा व महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत. त्यानुसार टास्क फोर्सने मान्यता दिल्यास अंगणवाडी उघडण्यास जिल्हा स्तरावर आवश्यक सर्व तयारीचे नियोजन करावे, अशा सूचना महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

महिला व बाल विकास विभागाची आढावा बैठक आय. ए. कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात मंगळवारी (दि.८) घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण निधीतून महिला व बाल विकास विभागाच्या विकासासाठी ३ टक्के निधी खर्च करण्याची परवानगी दिली आहे. तसेच या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याने महिला व बाल भवन उभारण्यासाठी नियोजन करावे, तसेच महिला आर्थिक विकास महामंडळासोबत बैठक घेऊन महिलांना अधिक आर्थिक सक्षम करण्यासाठी नियोजन करून जिल्हा परिषदेचे सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मार्चअखेर कामांचा आढावा घ्यावा, अशी सूचनाही कुंदन यांनी केली.

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, युनिसेफ आहारतज्ज्ञ राजलक्ष्मी नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अवर सचिव महेश वरुडकर, उपायुक्त प्रदीप पोतदार, गोकुळ देवरे, विजय क्षीरसागर, चंद्रशेखर पगारे उपस्थित होते.

चौकट===

अंगणवाड्या सक्षम कराव्यात

बालकांच्या विकासासाठी अंगणवाडी महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अंगणवाडीच्या कच्च्या इमारती असतील त्या पक्क्या इमारतीत रूपातंरित कराव्यात. तसेच विशेष मोहीम राबवून अंगणवाड्या सक्षम कराव्यात. कुपोषण निर्मूलनासाठी प्रत्येक जिल्ह्यात तरंग सुपोशित महाराष्ट्र व्हाॅट्सॲप चॅट बोर्ड अंमलबजावणी करावी. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण अभियानावर लक्ष केंद्रित करावे. तीव्र कुपोषित बालकासाठी अंगणवाडीस्तरावर व्हीसीडीसी सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचेही कुंदन यांनी सांगितले.

 

Web Title: Anganwadas will be started after the approval of the task force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.