अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:47 PM2020-02-12T12:47:47+5:302020-02-12T12:47:54+5:30

पेठ -सुरगाणा व पेठ तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नियमित वेतनासह इतर मागण्यासाठी एल्गार पुकारला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्विकारला आहे.

 Anganwadi employees' agitation | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Next

पेठ -सुरगाणा व पेठ तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी नियमित वेतनासह इतर मागण्यासाठी एल्गार पुकारला असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा स्विकारला आहे.
पेठ येथे आदिवासी भागातील अंगणवाडी सेविका व मदतणीस यांचा मेळावा घेण्यात आला. अंगणवाडी सेविका आणि मदतणीस यांना मानधन न देता वेतन देण्यात आले पाहिजे, प्रवास भत्ता, अमृत आहार योजना सुरू केली पण त्याचे पैसे मात्र अद्याप भेटले नाही, अंगणवाडीत फ्रीज असावा, इमारती बांधल्या पाहिजेत, त्यांचे सेवा पुस्तक भरण्यात यावे आदी मागण्या मांडण्यात आल्या. महेश टोपले यांनी पेसा कायदा व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी देवदत्त भगरे, रामदास सापटे , कमलेश बोसारे, निर्मला चौधरी, गुलबा चौधरी यांचेसह अंगणवाडी सेविका, डेटा आॅपरेटर, आशा ताई, पोषण आहार शिजवून देणार्या बचतगट माहिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Anganwadi employees' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक