अंगणवाडी दुरुस्ती, फाइल्सचा प्रवास गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:39 AM2018-12-21T00:39:58+5:302018-12-21T00:40:20+5:30

उघड्यावर अंगणवाड्या भरत असतानाही अंगणवाडी दुरुस्ती आणि नवीन बांधकामांबाबतची दिरंगाई, ३५० अंगणवाड्यांचे पडून असलेले प्रस्ताव, बांधकाम विभागाकडून विलंबाने होणाºया फाइल्सचा प्रवास आणि जिल्ह्णातील आरोग्य उपकेंद्रांचे बिघडलेले आरोग्य या विषयावर जिल्हा परिषदेची सर्वसाधारणसभा चांगलीच गाजली. विशेष म्हणजे अधिकाºयांचा ढिम्म कारभार आणि अनभिज्ञताही सभागृहात उघड झाली.

Anganwadi repairs, files went on air | अंगणवाडी दुरुस्ती, फाइल्सचा प्रवास गाजला

अंगणवाडी दुरुस्ती, फाइल्सचा प्रवास गाजला

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद : अनभिज्ञ अधिकाऱ्यांचा कारभार सभेत उघड

नाशिक : उघड्यावर अंगणवाड्या भरत असतानाही अंगणवाडी दुरुस्ती आणि नवीन बांधकामांबाबतची दिरंगाई, ३५० अंगणवाड्यांचे पडून असलेले प्रस्ताव, बांधकाम विभागाकडून विलंबाने होणाºया फाइल्सचा प्रवास आणि जिल्ह्णातील आरोग्य उपकेंद्रांचे बिघडलेले आरोग्य या विषयावर जिल्हा परिषदेची सर्वसाधारणसभा चांगलीच गाजली. विशेष म्हणजे अधिकाºयांचा ढिम्म कारभार आणि अनभिज्ञताही सभागृहात उघड झाली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शितल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांकडून अनेक प्रश्न मांडले जात असताना अधिकाºयांना मात्र अद्ययावत माहितीच नसल्याची बाब उघड झाल्याने सदस्यांनी अधिकाºयांच्या कारभावर तीव्र आक्षेप घेतला. शासनाचे आदेश, नियुक्तीचे नियम, रिक्त जागा, उघड्यावरील अंगणवाड्या तसेच पाणीपुरवठ्याच्या योजनांबाबतची माहिती अधिकाºयांना नसल्याची बाब सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली.
सदस्य दीपक शिरसाठी यांनी उघड्यावरील अंगणवाड्यांचा प्रश्न उपस्थित करताना आपल्या गटात अशाप्रकारच्या तीन अंगणवाड्या असल्याचे सभागृहाला सांगितले. अशाप्रकारे जिल्ह्णात किती अंगणवाड्या आहेत याची माहिती अधिकाºयांना देता आली नाही. यावेळी पूर्वीच्या निधीच्या तरतुदीमध्ये अंगणवाडी बांधणे शक्य नसल्याने दोन वर्षांपासून या अंगणवाड्याचे बांधकामदेखील रखडल्याचे समोर आले. गेल्या दोन वर्षांच्या दायित्वामुळे याहीवर्षी हा प्रश्न पडून राहणार असल्याने एकाच वर्षाचे दायित्व चालू वर्षाच्या मंजूर निधीतून देण्याचाही ठराव सदस्यांनी केला.
यावेळी मंजूर निधीतून दोन वर्षांच्या दायित्व वजा न करता केवळ गेल्या वर्षाचे दायित्व देण्याचा ठराव सदस्यांनी केला. उर्वरित दायित्वाकरिता वाढीव निधीची मागणी करण्याची मागणी केली. महेंद्रकुमार काले यांनी बांधकाम विभागातील फाइल्सचा प्रवास ४१ टेबलांवरून होत असल्याचे सप्रमाण सभागृहाला दाखविले. फाइल्सच्या कारभारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने फाइल्सचा प्रवास अनावश्यक टेबलांवर होत असल्याचे समागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी सदर प्रकार गंभीर असल्याचे सांगून प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्याकडे आलेल्या आणि निपटारा केलेल्या फाइल्सचा आढावा दर सोमवारी सादर करावा, असे आदेश अधिकाºयांना दिले. फाइल्सच्या प्रवासाची माहिती मिळविणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

अंगणवाड्यांचे बांधकाम रखडले
अंगणवाडी नवीन बांधकामसंदर्भात शासनाकडून पूर्वी ६ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर होता. यामध्ये अंगणवाडी बांधणे शक्य नसल्याने जिल्ह्णातील अंगणवाड्यांचे बांधकाम रखडले आहे. यातच नवीन आर्थिक वर्षात उपलब्ध निधीतून दायित्वच जाणार असल्याचे चालू वर्षी निधी नसल्याने हे कामेदेखील रखडणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचा विचार करता तातडीने अंगणवाडी बांधकाम सुरू करण्याची मागणी सदस्यांनी केली.

Web Title: Anganwadi repairs, files went on air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.