अंगणवाड्यांची दुरुस्ती ग्रामनिधीतून करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:02 AM2017-09-08T00:02:12+5:302017-09-08T00:08:53+5:30
जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीतून अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
नाशिक : जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वनिधीतून अंगणवाडी इमारतींची दुरुस्ती करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.
महिला व बालकल्याण सभापती अपर्णा खोसकर यांच्या उपस्थितीत महिला व बालकल्याण समितीची मासिक बैठक गुरुवारी (दि.७) झाली. बैठकीत महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात बहुतांश तालुक्यातून अंगणवाडी इमारती दुरुस्तीची मागणी आहे. मात्र त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर निधी उपलब्ध नाही. ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर महिला व बालकल्याण विभागासाठी अंदाजपत्रकात स्वतंत्रपणे राखीव निधी असतो. ग्रामपंचायतींनी या निधीमधून सन २०१७-१८च्या आर्थिक वर्षात प्राधान्याने अंगणवाडी इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी, असा ठराव बैठकीत संमत करण्यात आला. या ठरावानुसार संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांनी त्वरित कारवाई करण्याबाबतचे परिपत्रक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी त्वरित काढण्याच्या सूचना सभापती अपर्णा खोसकर यांनी दिल्या. जिल्हा परिषद सदस्य कविता धाकराव या एका गरीब कुटुंबातील गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेल्या. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या गर्भवती महिलेला तातडीने पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाºयावर कडक कारवाई करण्याची मागणी कविता धाकराव यांनी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाºयावर कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर करावा, अशा सूचना सभापती अपर्णा खोसकर यांनी दिल्या. बैठकीस सदस्य गणेश अहिरे, रेखा पवार, कविता धाकराव, कमल अहेर, सुनीता सानप, वैशाली खुळे, आशा पवार, सुमन बर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे आदी उपस्थित होते.